किंग्समन, प्रिंसेस ऍनाबेल यांनी आजचा दिवस गाजवला

Date:

पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019

पुणे: पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत सर्वात फेव्हरेट घोडा असलेल्या किंग्समन या घोड्याने 1400मीटर अंतरावरच्या द जे ई ह्युजेस ट्रॉफी  या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला. तर, द ऑगस्ट हँडीकॅप या महत्वाच्या लढतीत प्रिंसेस ऍनाबेल या घोड्याने विजेतेपद मिळवले.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब(आरडब्लूआयटीसी)येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी द जे ई ह्युजेस ट्रॉफी या महत्वाच्या लढतीत जे.एम.लाईव्हस्टोक प्रायव्हेट लिमिटेडचे जयदेव मोदी, स्ट्राईड लाईव्हस्टोक प्रायव्हेट लिमिटेडचे डॉ राम श्रॉफ व राज श्रॉफ आणि मंजिरी हॉर्स ब्रीडर्स फार्म प्रायव्हेट लिमिटेडचे मिस्टर व मिसेस शापुर पी.मिस्त्री यांच्या मालकीच्या किंग्समन या घोड्याने 1मिनिट 26 सेकंद आणि 65 मिनिसेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. याचा जॉकी यश नरेदू आणि दीपेश नरेदू हा प्रशिक्षक होता.

द ऑगस्ट हँडीकॅप या महत्वाच्या लढतीत गौरव सेठी, अभिमन्यू ठाकरसी, शुभा सेठी, कनिका कोछर आणि चिराग पिटीज यांच्या मालकीच्या प्रिंसेस ऍनाबेल या घोड्याने 1मिनिट 26 सेकंद व 652 मिनिसेकंद वेळ नोंदवत विजेतेपद मिळवले. याचा भवानी सिंग हा जॉकी होता आणि अल्तमेश अहमद हा प्रशिक्षक होता.

सविस्तर निकाल
द स्ट्रॅटेजिक मूव्ह प्लेट क्लास IV
विजेता-एडेले, उपविजेता-झोझो;

द ए जे वाडिया प्लेट-डिव्हिजन 2
विजेता-रेड फायर, उपविजेता-लिलीबेथ

द जे ई ह्युजेस ट्रॉफी
विजेता-किंग्समन, उपविजेता-वेलेरिओ

द गुडनेस ग्रेशियस प्लेट
विजेता-हेडवे, उपविजेता-जेटफायर;

द ऑगस्ट हँडीकॅप
विजेता-प्रिंसेस ऍनाबेल, उपविजेता-मिझिलकाझी;

द ए जे वाडिया प्लेट-डिव्हिजन 1
विजेता-हायलँड दास, उपविजेता-ओस्पिशियस

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...