स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत विपार स्पिडिंग चिताज संघाचा बाद फेरीत प्रवेश
पुणे-पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत विपार स्पिडिंग चिताज संघाने पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाचा 44-30 असा पराभव करत सलग चौथ्या विजयासह बाद फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत विपार स्पिडिंग चिताज संघाने पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाचा 44-30 असा पराभव करत सलग चौथ्यांदा विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला. 8 वर्षाखालील मिश्र गटात नमिष हुडने अचिंत्य कुमारचा 4-0 असा एकतर्फी पराभव करत विजयी सुरूवात केली. 12 वर्षाखालील मुलींच्या गटात सलोनी परीदाने वैष्णवी सिंगचा 6-0 असा पराभव केला. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात ईशान देगमवारने मोक्ष सुगंधीचा 6-3 असा तर मुलींच्या गटात अलिना शेखने शान्या हटणकरचा 6-0 असा पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.
14 वर्षाखालील दुहेरी गट गटात केयुर म्हेत्रे व अदनान लोखंडवाला यांनी आदित्य राय व आदित्य भट्टेवारा यांचा 6-4 असा तर 10 वर्षाखालील दुहेरी गटात वेद मोघे व रियान माळी या जोडीने दक्ष पाटील व मनन अगरवाल यांचा 4-2 असा पराभव केला. मिश्र दुहेरी गटात श्रावणी पत्की व विश्वजीत सनस या जोडीने सिमरन छेत्री व अभिनीत शर्मा यांचा 6-1 असा पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.
विपार स्पिडिंग चिताज वि.वि पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स: 44-30 (एकेरी: 8 वर्षाखालील मिश्र गट: नमिष हुड वि.वि अचिंत्य कुमार 4-0; 10वर्षाखालील मुले: क्रिशांक जोशी पराभूत वि राम मगदुम 2-4; 10वर्षाखालील मुली: हृतीका कापले पराभूत वि आस्मी टिळेकर 0-4;
12 वर्षाखालील मुले: अर्चीत धुत पराभूत वि अभिराम निलाखे 3-6;
12 वर्षाखालील मुली: सलोनी परीदा वि.वि वैष्णवी सिंग 6-0; 14 वर्षाखालील मुले: ईशान देगमवार वि.वि मोक्ष सुगंधी 6-3; 14 वर्षाखालील मुली: अलिना शेख वि.वि शान्या हटणकर 6-0; कुमार दुहेरी गट: कृष्णा घुवलेकर/वेदांग काळे पराभूत वि अमोद सनस/अर्णव बनसोडे 1-6; 14 वर्षाखालील दुहेरी गट: केयुर म्हेत्रे/अदनान लोखंडवाला वि.वि आदित्य राय/ आदित्य भट्टेवारा 6-4, 10 वर्षाखालील दुहेरी गट: वेद मोघे/रियान माळी वि.वि दक्ष पाटील/मनन अगरवाल 4-2; मिश्र दुहेरी गट: श्रावणी पत्की/विश्वजीत सनस वि.वि सिमरन छेत्री/अभिनीत शर्मा 6-1