पुणे, 25 जुन 2019 पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाने विपार स्पिडिंग चिताज संघाचा 48-26 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला
डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीच्या सामन्यात कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाने विपार स्पिडिंग चिताज संघाचा 48-26 असा एकतर्फी पराभव केला. कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाकडून नील केळकर, आरुष मिश्रा, मृणाल शेळके, अनमोल नागपुरे, रुमा गायकवारी, प्रणव इंगोळे, रियान मुजगुले, समीहन देशमुख, स्वर्णीम येवलेकर, डेलिशा रामघट्टा, अथर्व जोशी यांनी सुरेख कामगिरी बजावली. तर, विपार स्पिडिंग चिताजकडून नमिश हूड, सलोनी परिदा, केयूर म्हेत्रे, अदनान लोखंडवाला यांनी विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स वि.वि.विपार स्पिडिंग चिताज 48-26(एकेरी: 8वर्षाखालील मिश्र गट: श्रावि देवरे पराभूत वि. नमिश हूड 0-4; 10वर्षाखालील मुले: नील केळकर वि.वि.वेद मोघे 4-0; 10वर्षाखालील मुली: मृणाल शेळके वि.वि.ध्रुवी अद्यांता 4-1; 12व र्षाखालील मुले: आरुष मिश्रा वि.वि.अर्चित धूत 6-0; 12वर्षाखालील मुली: रितिका मोरे पराभूत वि.सलोनी परिदा 1-6; 14वर्षाखालील मुले: अनमोल नागपुरे वि.वि. ईशान देगमवार 6-0; 14वर्षाखालील मुली: रुमा गायकवारी वि.वि.अलिना शेख 6-0; कुमार दुहेरी गट: प्रणव इंगोळे/रियान मुजगुले वि.वि.ऐतरेत्या राव/वेदांग काळे 6-2; 14वर्षाखालील दुहेरी गट: अर्जुन अभ्यंकर/ऋषिकेश बर्वे पराभूत वि. केयूर म्हेत्रे/अदनान लोखंडवाला (4)5-6; 10वर्षाखालील दुहेरी गट: समीहन देशमुख/स्वर्णीम येवलेकर वि.वि.रियान माळी/क्रिशांक जोशी 4-2; मिश्र दुहेरी: डेलिशा रामघट्टा/अथर्व जोशी वि.वि.नाव्या भामिदिप्ती/विश्वजित सणस 6-5(6)).