पुणे–पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत फ्लाईंग हॉक्स संघाने पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाचा 44-43 असा संघर्षपूर्ण पराभव करून दुसरा विजय मिळवला
डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीच्या अतितटीच्या झालेल्या लढतीत फ्लाईंग हॉक्स संघाने कडवी झुंज देत पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाचा 44-43 असा पराभव केला. विजयी संघाकडून अंशुल पुजारी, सक्षम भन्साळी, सुधांशु सावंत, कौशिकी समंता, एंजल भाटिया, चिराग चौधरी यांनी अफलातून कामगिरी केली. पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाकडून आस्मि टिळेकर, अभिराम निलाखे, वैष्णवी सिंग, अर्णव बनसोडे, सार्थ बनसोडे, मोक्ष सुगंधी, आदित्य भटेवरा, दक्ष पाटील, मनन अगरवाल यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
फ्लाईंग हॉक्स वि.वि.पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स 44-43(एकेरी: 8 वर्षाखालील मिश्र गट: अंशुल पुजारी वि.वि.अचिंत्य कुमार 4-2; 10 वर्षाखालील मुले: सक्षम भन्साळी वि.वि.राम मगदूम 4-0; 10वर्षाखालील मुली: जसलीन कटारिया पराभूत वि.आस्मि टिळेकर 1-4;12 वर्षाखालील मुले: तेज ओक पराभूत वि.अभिराम निलाखे 4-6; 12वर्षाखालील मुली: श्रावणी देशमुख पराभूत वि.वैष्णवी सिंग (4)5-6; 14 वर्षाखालील मुली: सुधांशु सावंत वि.वि.अमोद सबनीस 6-0; 14वर्षाखालील मुली: कौशिकी समंता वि.वि.सिमरन छेत्री 6-4; कुमार दुहेरी गट: श्लोक गांधी/अर्जुन किर्तने पराभूत वि.अर्णव बनसोडे/सार्थ बनसोडे 3-6; 14वर्षाखालील दुहेरी गट: पार्थ देवरुखकर/तनिश बेळगळकर पराभूत वि.मोक्ष सुगंधी/आदित्य भटेवरा (4)5-6; 10वर्षाखालील दुहेरी गट: नीव जॉजिया/देव घुवालेवाला पराभूत वि.दक्ष पाटील/मनन अगरवाल 0-4; मिश्र दुहेरी गट: एंजल भाटिया/चिराग चौधरी वि.वि.अभिनीत शर्मा/ईशान्य हटनकर 6-5(5));