पाचगणी, दि.6 ऑक्टोबर 2017- रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या रवाईन हॉटेल दिवाळी स्मॅश सुपर सिरीज् 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात मुंबईच्या आर्यन भाटिया याने, तर मुलींच्या गटात सान्या सिंग या खेळाडूंनी एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
रवाईन हॉटेल, पाचगणी येथील टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात सातव्या मानांकित व मुंबईच्या आर्यन भाटियाने आपली विजयी मालिका कायम ठेवत दुसऱ्या मानांकित व कर्नाटकाच्या निखिल निरंजनचा ६-३, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकावले. १ तास २० मिनिटे चाललेल्या या सामन्यात पाहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सामन्यात २-२ अशी बरोबरी निर्माण झाली. त्यानंतर आर्यन याने नेटजवळून आक्रमक खेळ करत निखिलची पाचव्या व सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट ६-३ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये आर्यनने आपले वर्चस्व कायम राखत निखिलची पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट ६-२ असा सहज जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित सान्या सिंग हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत तिसऱ्या मानांकित हृदया शहाचा ६-३, ६-३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना १तास ४५ मिनिटे चालला. दुहेरीत अंतिम फेरीत सान्या सिंगने शनाया नाईकच्या साथीत राधिका महाजन व इशिता जाधव यांचा ६-४, ७-५ असा पराभव करून एकेरी गटांतील विजेतेपदाबरोबरच या गटात विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट पटकावला.
दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत आर्यन भाटियाने आदित्य बालसेकरच्या साथीत हितेश पी. व आर्य राज या जोडीचा ६-३, १-६, १०-७ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक, प्रशस्तीपत्रक व आकर्षक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक जावेद सुनेसरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: मुले:
आर्यन भाटिया(७)वि.वि.निखिल निरंजन(२)६-३, ६-२;
मुली: सान्या सिंग(१)वि.वि.हृदया शहा(३)६-३, ६-३;
दुहेरी गट: मुले: उपांत्य फेरी:
हितेश पी./आर्य राज(४)वि.वि.सर्वेश बिरमाने/निरंजन निखिल(१)६-४, २-६, १०-६;
आदित्य बालसेकर/आर्यन भाटिया वि.वि.अर्जुन कुंडू/संस्कार चोभे ६-१, ७-६(२);
अंतिम फेरी:आदित्य बालसेकर/आर्यन भाटिया वि.वि.हितेश पी./आर्य राज(४)६-३, १-६, १०-७;
मुली: उपांत्य फेरी:
राधिका महाजन/इशिता जाधव(४)वि.वि. गार्गी पवार/हृदया शहा(१)६-७(५), ६-४, १०-८;
शनाया नाईक/सान्या सिंग(२)वि.वि.कथा बिरमाने/हर्षिता बांगेरा ६-३, ६-२;
अंतिम फेरी: शनाया नाईक/सान्या सिंग(२)वि.वि.राधिका महाजन/इशिता जाधव(४)६-४, ७-५.

