पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाची विजयी सलामी

Date:

पुणेपुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाने मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा 42-39 असा पराभव करून विजयी सलामी दिली. 

डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीच्या पहिल्या सामन्यात कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स  संघाने मेट्रोसिटी रेजिंग बुल्स संघाचा 42-39 असा संघर्षपूर्ण पराभव केला. सामन्यात 8वर्षाखालील मिश्र गटात रोअरिंग लायन्सच्या वीरा हरपुडेला रेजिंग बुल्सच्या नील देसाईने 1-4 असे, तर 10वर्षाखालील मुलांच्या गटात रोअरिंग लायन्सच्या नील केळकरला  रेजिंग बुल्सच्या शार्दूल खवळेने 1-4 असे पराभूत करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 10 वर्षाखालील मुलींच्या गटात रोअरिंग लायन्सच्या मृणाल शेळकेने स्वर्णिका रॉयचा 4-2 असा तर 12 वर्षाखालील मुलांच्या गटात आरुष मिश्राने अद्विक नाटेकरचा टायब्रेकमध्ये 6-5(5) असा पराभव करून संघाचे आव्हान कायम राखले. 12वर्षाखालील मुलीच्या गटात रितिका मोरेचा रेजिंग बुल्सच्या प्रिशा शिंदेने 2-6 असा पराभव केला.  14वर्षाखालील मुलांच्या गटात रोअरिंग लायन्सच्या अनमोल नागपुरे याने जय पवारचा 6-2, तर मुलींच्या गटात रुमा गायकैवारीने  रेजिंग बुल्सच्या  संचिता नगरकरचा 6-0 असा सहज पराभव केला. कुमार दुहेरी मुलांच्या गटात  प्रणव गाडगीळ व रियान मुजगुले यांचा रेजिंग बुल्सच्या जश शहा व शौर्य राडे यांनी 3-6 असा पराभव केला. 14वर्षाखालील मुलांच्या दुहेरीत रोअरिंग लायन्सच्या अर्जुन अभ्यंकर व ऋषिकेश बर्वे  यांनी मानस गुप्ता व देवेन चौधरी या जोडीचा 6-1 असा पराभव केला. 10 वर्षाखालील मुलांच्या दुहेरीत रेजिंग बुल्सच्या वरद पाटील व वीरेन चौधरी या जोडीने  रोअरिंग लायन्सच्या समीहन देशमुख व आर्यन किर्तने यांना 4-1 असे नमविले. मिश्र दुहेरीत रोअरिंग लायन्सच्या कनिका बाबरने अथर्व जोशीच्या साथीत रेजिंग बुल्सच्या आदित्य ठोंबरे व याशिका बक्षी यांचा टायब्रेकमध्ये 6-5(7)) असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला. 
 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:

कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स वि.वि.मेट्रोसिटी रेजिंग बुल्स 42-39(एकेरी: 8वर्षाखालील मिश्र गट: वीरा हरपुडे पराभूत वि.नील देसाई 1-4; 10वर्षाखालील मुले: नील केळकर पराभूत वि. शार्दूल खवळे 1-4; 10 वर्षाखालील मुली: मृणाल शेळके वि.वि.स्वर्णिका रॉय 4-2; 12 वर्षाखालील मुले: आरुष मिश्रा वि.वि.अद्विक नाटेकर 6-5(5); 12वर्षाखालील मुली: रितिका मोरे पराभूत वि. प्रिशा शिंदे 2-6; 14वर्षाखालील मुले: अनमोल नागपुरे वि.वि.जय पवार 6-2; 14वर्षाखालील मुली: रुमा गायकैवारी वि.वि.संचिता नगरकर 6-0; कुमार दुहेरी मुले: प्रणव गाडगीळ/रियान मुजगुले पराभूत वि.जश शहा/शौर्य राडे 3-6; 14वर्षाखालील मुले दुहेरी: अर्जुन अभ्यंकर/ऋषिकेश बर्वे वि.वि.मानस गुप्ता/देवेन चौधरी 6-1; 10 वर्षाखालील मुले दुहेरी: समीहन देशमुख आर्यन किर्तने पराभूत वि. वरद पाटील/वीरेन चौधरी 1-4; मिश्र दुहेरी: कनिका बाबर/अथर्व जोशी वि.वि.आदित्य ठोंबरे/याशिका बक्षी 6-5(7));
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...