वीर चॊत्रानी, अभिषेक अगरवाल, तन्वी खन्ना, यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

Date:

पुणे-महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए) यांच्या तर्फे आयोजित व स्क्वॅश रॅकेटस्‌ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसआरए-76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात दिल्लीच्या तन्वी खन्ना हिने तर, पुरुष गटात वीर चॊत्रानी, अभिषेक अगरवाल  या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.


अमनोरा मॉल ग्लास कोर्ट, आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस्‌ क्लब, मुंढवा, आणि आरएसआय येथील स्क्वॅश कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पुरुष गटात महाराष्ट्राच्या वीर चॊत्रानी याने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत सर्व्हिसेसच्या पंधराव्या मानांकित संदीप जांगराचा 11-9, 6-11, 11-6, 11-5असा पराभव उपांत्य फेरीत धडक मारली. चुरशीच्या झालेल्या लढतीत तिसऱ्या मानांकित महाराष्ट्राच्या अभिषेक अगरवाल याने सहाव्या मानांकित सर्व्हिसेसच्या रणजित सिंगचा 11-9, 11-5, 9-11, 11-9 असा पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान  निश्चित केले 

 
महिला गटात उपांत्यपूर्व फेरीत चौथ्या मानांकित तन्वी खन्ना हिने काल मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळविणाऱ्या मुंबईच्या सुनीता पटेलचा 11-4, 11-6, 11-6 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
 
पुरुष 35 वर्षावरील गटात दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्या मनीष चव्हाण याने कर्नाटकाच्या पाचव्या मानांकित जेगणराज जेयाप्रकाशामचा 11-2, 11-7, 11-5 असा तर, दिल्लीच्या हरजिंदर सिंगने महाराष्ट्राच्या तिसऱ्या मानांकित पारस बेरावालाचा 12-10, 11-4, 11-3 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. महाराष्ट्राच्या भालचंद्र बुल्ल याने आपलाच राज्य सहकारी चौथ्या मानांकित राहुल अरोराचा 11-4, 11-6, 11-4 असा तर, राजस्थानच्या 
कपिल मुर्जानीने  सहाव्या मानांकित महाराष्ट्राच्या सौरभ सिन्हाचा 11-6, 11-4, 11-3 असा पराभव करून आगेकूच केली.  
 
पुरुष 50वर्षावरील गटात महाराष्ट्राच्या समीर खरे याने दिल्लीच्या तिसऱ्या मानांकित अमित भाटियाचा 11-6, 11-3, 11-6 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.
 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पुरुष गट: उपांत्यपूर्व फेरी:
वीर चॊत्रानी(महाराष्ट्र)वि.वि.संदीप जांगरा(सर्व्हिसेस)[15]11-9, 6-11, 11-6, 11-5;
अभिषेक अगरवाल(महाराष्ट्र)[3]वि.वि.रणजित सिंग(सर्व्हिसेस)[6]  11-9, 11-5, 9-11, 11-9;


महिला गट:उपांत्यपूर्व फेरी:
तन्वी खन्ना(दिल्ली)[4]वि.वि.सुनीता पटेल(महाराष्ट्र) 11-4, 11-6, 11-6;
 
 
पुरुष 35 वर्षावरील गट: दुसरी फेरी: 
अमितपाल कोहली(दिल्ली)[1]वि.वि.आनंदराव शिंदे(महाराष्ट्र)11-2, 11-2, 11-2;
मनीष चव्हाण(महाराष्ट्र)वि.वि.जेगणराज जेयाप्रकाशाम(कर्नाटक)[5]11-2, 11-7, 11-5;
हरजिंदर सिंग(दिल्ली)वि.वि.पारस बेरावाला(महाराष्ट्र)[3]12-10, 11-4, 11-3;
भालचंद्र बुल्ल(महाराष्ट्र)वि.वि.राहुल अरोरा(महाराष्ट्र)[4]11-4, 11-6, 11-4;
कपिल मुर्जानी(राजस्थान)वि.वि.सौरभ सिन्हा(महाराष्ट्र)[6]11-6, 11-4, 11-3;
योगेश ठुबे(महाराष्ट्र)वि.वि.अमित गजरीया(महाराष्ट्र)[8] 11-8, 9-11, 6-11, 11-4, 11-6;
 
पुरुष 40 वर्षावरील गट: दुसरी फेरी: 
सौरभ नायर(छत्तीसगड)[1]वि.वि.सुधाकर गायकवाड(महाराष्ट्र)11-5, 11-4, 11-5;
जॉनी जिम्मी वेलनिकरण(केरळ)वि.वि.कबिर सुबेदार(महाराष्ट्र)[5] 11-9, 10-12, 9-11, 11-7, 11-4;
अमित चिनाय(गुजरात)[3]वि.वि.अभिषेक थापर(दिल्ली)11-4, 11-3, 11-7;
सचिन जाधव(महाराष्ट्र)[4]वि.वि.बेंजमिन नादरपल्ली(महाराष्ट्र)11-9, 11-6, 12-10;
हेमंत नाडकर्णी(महाराष्ट्र)[2]वि.वि.सुमित कुमार(हरियाणा)11-9, 11-1, 11-4;      
   
पुरुष 45वर्षावरील गट: पहिली फेरी: 

दलिप त्रिपाठी(पश्चिम बंगाल)[1]वि.वि.अनुप कबडवाल(कर्नाटक)11-2, 11-8, 11-1; 
आशुतोष पेडणेकर(महाराष्ट्र)वि.वि.संजय गुप्ता(महाराष्ट्र)[5]12-10, 11-7, 11-6; 
विकास नायर(छत्तीसगड)[3]वि.वि.नवीन शेनॉय(कर्नाटक)11-5, 11-9, 11-9;
अनिल भगत(दिल्ली)[2]वि.वि.संजय राजपाल(कर्नाटक)[8]11-3, 9-11, 11-5, 11-2;
 
पुरुष  50 वर्षावरील गट: उपांत्यपूर्व फेरी:
विवान खुबचंद(दिल्ली)[1]वि.वि.राजीव भाटिया(मध्यप्रदेश)[8]11-8, 11-6, 7-11, 11-2;
सौरभ देवकुळीयर(कर्नाटक)[6]वि.वि.नरिंदर पाल सिंग होरा(चंदीगड)11-6, 11-5, 10-12,11-6;
जॉयसन बोथेलो(महाराष्ट्र)वि.वि.शरद काकू(महाराष्ट्र)11-9, 11-8, 7-11, 11-3;
समीर खरे(महाराष्ट्र)वि.वि.अमित भाटिया(दिल्ली)[3]11-6, 11-3, 11-6. 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्राजक्ता पटवर्धन यांना भाऊसाहेब स्मृती पाटणकर स्मृती पुरस्कार

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य...

अडचणींना सामोरे जात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्या : गजाला शेख

गजाला शेख लिखित ‘द फिनिक्स पाथ’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे :...

शशिकांत सुतारांच्या पुत्राने ठाकरेंना दिला मोठा हादरा, संजय भोसलेंसह भाजपात केला प्रवेश

मुरलीधर मोहोळ,गणेश बिडकर,श्रीनाथ भिमाले यांची विरोधकांची बलस्थाने काबीज करणारी...

प्रशांत जगताप स्वार्थी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष जगताप म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार , प्रशांत जगताप यांनी...