76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत देशभरांतून एकूण 474 खेळाडू सहभागी

Date:

अमनोरा मॉल येथे स्क्वॅश ग्लास कोर्टहा मान मिळविणारे देशातील दुसरे 
 

पुणे- महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए) यांच्या तर्फे आयोजित व स्क्वॅश रॅकेटस्‌ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखालीहोत असलेल्या 76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत 25राज्यांतील एकूण 474  खेळाडूंमध्ये जोश्ना चिनप्पा, महेश माणगावकरयांसारखे अव्वल मानांकित भारतीय खेळाडू झुंजणार आहेत. ही स्पर्धा दि.10 ते 16 जून 2019 या कालावधीत आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस्‌ क्लब, मुंढवा, आरएसआय आणि अमनोरा मॉल ग्लास स्क्वॅश कोर्टवर होणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए)चे अध्यक्ष डॉ.प्रदीप खांड्रे आणि सचिव डॉ. ए. दयानंद कुमार यांनी सांगितलेकी, राजस्थान, चेन्नई, चंदीगढ, गुजरात, दिल्ली आणि महाराष्ट्र अशा 25राज्यांतील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये 115महाराष्ट्रातील खेळाडूंचा समावेश आहे. स्पर्धेला पंचशील आणि जहांगीर हॉस्पिटल यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

तसेच, या स्पर्धेला एसआरएफआय 7 स्टारची मान्यता मिळाली असून ही स्पर्धा स्क्वॅश रॅकेटस्‌ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होतआहे. स्पर्धेत एकुण 12लाख रूपयांची पारितोषिके देण्यात असून विजेत्या खेळाडूंना मानांकन गुण मिळणार आहेत.

यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष व पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट म्हणाले की, इतक्या उच्च दर्जाची स्पर्धा आयोजित करण्याचा मान पुणेशहराला अभिमान व आनंद वाटत आहे. स्क्वॅश या खेळामुळे पुणे शहर हे नेहमीच आघाडीवर राहिले आहे या स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यातआल्यामुळे शहरातील आणि राज्यातील गुणवान स्क्वॅशपटुंना प्रोत्साहन देण्याबरोबरच पुणे शहरातील स्क्वॅश विश्वाला पुन्हा एकदा राष्ट्रीयस्तरावर स्थान मिळवून देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.

महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए)चे अध्यक्ष डॉ.प्रदीप खांड्रे म्हणाले की, ही स्पर्धा एकुण 9 वयोगटात होणार असून यामध्ये पुरुष व महिलागट, 35वर्षावरील, 40वर्षावरील, 45वर्षावरील, 50वर्षावरील, 55वर्षावरील, 60वर्षावरील, 65वर्षावरील पुरुष गट आणि प्रोफेशनल गट यांचा समावेश आहे.यातील पुरुष व महिला गटातील सामने अमनोरा मॉल येथे उभारण्यात आलेल्या ग्लास कोर्टवर होणार असून इतर गटातील सामने आयस्क्वॅश अकादमीयेथे होणार आहेत. अमनोरा मॉल येथे नव्याने उभारण्यात हे  खास  स्क्वॅश ग्लास कोर्टमुळे पुण्याला देशातील अशा प्रकारचे स्क्वॅश ग्लास कोर्ट असलेलेकेवळ दुसरे बनण्याचा मान मिळाला आहे. स्पर्धेत महेश मानगावकर, उर्वशी जोशी, जोश्ना चिनप्पा यासांरखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, आशियाई पदकविजेते खेळाडू व राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेते खेळाडूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा अधिकच चुरशीची होणार असल्याचे त्यांनी नमुद केले.

स्पर्धेत अमितपाल कोहली(35वर्षावरील),सौरभ नायर(40वर्षावरील), दिलीप त्रिपाठी(45वर्षावरील), आशिष कामत(50वर्षावरील), आशूनबेहल(55वर्षावरील), ललित कुमार अग्निहोत्री(60वर्षावरील), राजीव रेड्डी(65वर्षावरील) हे अव्वल मानांकित खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणारआहेत, तसेच याशिवाय या वरिष्ठ खेळाडूंसह अर्णव सरीन, अनिका दुबे, रौनक सिंग आणि तीर्थ झिल्का हे मानांकित कुमार झुंजणार असल्याचेएमएसआरएचे सचिव डॉ. ए. दयानंद कुमार  सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

पुणे, दि. 4 मार्च: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे...

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. ४ मार्च २०२६.राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत...

श्री रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पुणे- आर. एम. धारीवाल फाउंडेशन तर्फे समाजसेवेची अखंड परंपरा...

मुळा-मुठा नदी प्रदूषणाविरोधात ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्यांचा एल्गार

नदीपात्रात अवैध कचरा टाकण्याविरोधात विद्यापीठ प्रवेशद्वारावर आंदोलन; आगी व...