Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा डेक्कन जिमखानावर 97 धावांनी विजय

Date:

पुणे, दि.27 मे 2019:  पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत रोहन दामलेच्या नाबाद 71 धावांच्या खेळीसह यश माने, अभिषेक परमार, साहिल छुरी यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 97 धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात काल पीवायसी संघाने 40षटकात 8बाद 241धावा केल्या. डेक्कन जिमखानाचा 21 षटकांपासून आज खेळ सुरु झाला. यात स्वप्निल फुलपगारे 54, अभिषेक ताटे 38, यश बोरामनी 27, धीरज फतंगरे 19, प्रखर अगरवाल नाबाद 26, निकुंज बोरा 16यांनी धावा केल्या. पीवायसीकडून योगेश चव्हाण(33-2), रोहन दामले(28-1), साहिल छुरी(17-1), दिव्यांग हिंगणेकर(49-1), प्रदीप दाढे(39-1), यश माने(30-1) यांनी सुरेख गोलंदाजी करत डेक्कनला 227 धावांवर रोखून पहिल्या डावात 49 धावांची आघाडी घेतली. डेक्कनचे 7 गडी बाद झाल्याने संघाची अंतिम धावसंख्या 143(वजा 35धावा)झाली.

दुसऱ्या डावात पीवायसी संघाने 20 षटकात 6 बाद 173धावा केल्या. पण त्यांचे 6 गडी बाद झाल्याने पीवायसीची अंतिम धावसंख्या 143(वजा 30 धावा)झाली. यात रोहन दामलेने अफलातून फलंदाजी करत 46 चेंडूत 5चौकार व 3षटकारांसह नाबाद 71 धावा चोपल्या. रोहनला दिव्यांग हिंगणेकरने 39 चेंडूत 34 धावांची संयमपूर्ण खेळी करून साथ दिली. रोहन व दिव्यांग यांनी तिसऱ्या गडयासाठी 42 चेंडूत 55 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. दिव्यांग बाद झाल्यानंतर रोहन दामले व मंदार भंडारी(16धावा) यांनी चौथ्या गडयासाठी 37 चेंडूत 44 धावांची भागीदारी करून संघाला 173धावांचे आव्हान उभे करून दिले. डेक्कन जिमखाना संघाला विजयासाठी 193धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना डेक्कन जिमखाना संघाला निर्धारित षटकात 8 बाद 136 धावाच करता आल्या. डेक्कनचे 8 गडी बाद झाल्यामुळे संघाची अंतिम धावसंख्या 96(वजा 40धावा)झाली. यात धीरज फतंगरे 58 चेंडूत 74धावा व यश बोरामनी 11 धावा यांनी दुसऱ्या गडयासाठी 43 चेंडूत 33 धावांची भागीदारी केली. पण हे दोघेही बाद झाल्यानंतर एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही व त्यामुळे पीवायसी संघाने डेक्कनवर 97 धावांनी विजय मिळवला. पीवायसीकडून यश मानेने 6 धावात 2गडी, अभिषेक परमारने 22 धावात 2, साहिल छुरीने 22धावात 2 गडी, तर रोहन दामले(31-1), दिव्यांग हिंगणेकर (14-1) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सामन्याचा मानकरी दिव्यांग हिंगणेकर ठरला.

स्पर्धेत पहिला उपांत्य फेरीचा सामना पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर पीवायसी विरुद्ध केडन्स संघाशी, तर दुसरा सामना डेक्कन जिमखाना विरुद्ध व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाशी बुधवार, 29 व गुरुवार 30 मे या दिवशी होणार आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पीवायसी हिंदू जिमखाना: 40षटकात 8बाद 241धावा (281-40धावा)(दिव्यांग हिंगणेकर नाबाद 111(119,9×4,4×6), मंदार भंडारी 45(74,4×4,1×6), अभिषेक परमार 33(39), अमेय भावे 17(35), आदित्य लोंढे 15(16), करण जाधव 13, योगेश चव्हाण 10, धीरज फतंगरे 8-77-2, श्लोक धर्माधिकारी 8-50-2, मुकेश चौधरी 8-42-1, प्रखर अगरवाल 7-55-1) वि.डेक्कन जिमखाना: 40षटकात 7बाद 143धावा(227-35धावा)( स्वप्निल फुलपगारे 54(91,4×4,1×6), अभिषेक ताटे 38(39,5×4,1×6), यश बोरामनी 27(35,6×4), धीरज फतंगरे 19, प्रखर अगरवाल नाबाद 26(57), निकुंज बोरा 16, योगेश चव्हाण 8-33-2, रोहन दामले 8-28-1, साहिल छुरी 3-17-1, दिव्यांग हिंगणेकर 6-49-1, प्रदीप दाढे 6-39-1, यश माने 5-30-1); पहिल्या डावात पीवायसीकडे 49 धावांची आघाडी;

दुसरा डाव: पीवायसी हिंदू जिमखाना: 20षटकात 6बाद 143धावा(173-30धावा)(रोहन दामले नाबाद 71(46,5×4,3×6), दिव्यांग हिंगणेकर 34(39,4×4,1×6), मंदार भंडारी 16(22), प्रखर अगरवाल 3-30-2, धीरज फतंगरे 4-26-1, श्लोक धर्माधिकारी 2-36-1) वि.वि.डेक्कन जिमखाना: 20षटकात 8बाद 96धावा(136-40धावा)(धीरज फतंगरे 74(58,11×4), स्वप्निल फुलपगारे 14, यश बोरामनी 11, यश माने 2-6-2, अभिषेक परमार 4-22-2, साहिल छुरी 3-22-2, रोहन दामले 4-31-1, दिव्यांग हिंगणेकर 2-14-1); सामनावीर-दिव्यांग हिंगणेकर: पीवायसी संघ 97 धावांनी विजयी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...