धीरज फतंगरे व स्वप्निल फुलपगारे यांची शतकी भागीदारी

Date:

पहिल्या दिवसअखेर डेक्कन जिमखाना संघाचे वर्चस्व 

पुणे:  पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित  पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात डेक्कन जिमखाना संघाने अचूक गोलंदाजी करत पूना क्लब संघाला 175 धावांवर रोखले व त्यानंतर धीरज फतंगरे(नाबाद 91धावा) व स्वप्निल फुलपगारे(नाबाद 41धावा)यांनी तिसऱ्या गडयासाठी 105 धावांची भागीदारी करून पहिल्या दिवशी वर्चस्व राखले.

डेक्कन जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात डेक्कन जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेक्कनच्या अचूक गोलंदाजी व सुरेख क्षेत्ररक्षणापुढे पूना क्लब संघाचा डाव 37षटकात 175 धावांवर संपुष्टात आला. पण त्यांचे 10 गडी बाद झाल्यामुळे पूना क्लबची अंतिम धावसंख्या 125धावा (वजा50धावा) झाली.  सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर मधल्या फळीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यात अकिब शेख 31धावा व ऋषीकेश मोटकर 24धावा यांनी चौथ्या गडयासाठी 75 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आशिष सूर्यवंशी 47 धावा व ओंकार आखाडे 30धावा यांनी सातव्या गडयासाठी 103 चेंडूत 70 धावांची भागीदारी केली.डेक्कनकडून मुकेश चौधरीने शिस्तबद्ध गोलंदाजी करत 26 धावांत 4 महत्वपूर्ण गडी बाद केले. प्रखर अगरवालने 42धावात 2 गडी, तर आशय पालकर(30-1), धीरज फतंगरे(33-1), आर्यन बांगळे(37-1)यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून पूना क्लबला 175धावांवर रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना डेक्कन जिमखाना संघाने आजदिवस अखेर 27षटकात 2बाद 149धावा केल्या. यामध्ये धीरज फतंगरेने संयमपूर्ण खेळी करत 115 चेंडूत 10 चौकार व 1षटकारांच्या मदतीने नाबाद 91 धावांची खेळी केली. धीरजला स्वप्निल फुलपगारेने 70 चेंडूत नाबाद 41धावा काढून सुरेख साथ दिली. धीरज व स्वप्निल यांनी तिसऱ्या गडयासाठी 147 चेंडूत 105 धावांची भागीदारी करून संघाला सुस्थित आणून ठेवले. पहिल्या डावातील डेक्कन जिमखाना संघाचा अजून उर्वरित 13 षटकांचा खेळ बाकी आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
पहिला डाव: पूना क्लब: 37षटकात सर्वबाद 125धावा(175-50धावा)(आशिष सूर्यवंशी 47(70), अकिब शेख 31(55), ओंकार आखाडे 30(73), ऋषीकेश मोटकर 24(26), यश नाहर 16(35), मुकेश चौधरी 8-26-4, प्रखर अगरवाल 8-42-2, आशय पालकर 7-30-1, धीरज फतंगरे 6-33-1, आर्यन बांगळे 8-37-1) वि.डेक्कन जिमखाना: 27षटकात 2बाद 149धावा(धीरज फतंगरे नाबाद 91(115,10×4,1×6), स्वप्निल फुलपगारे नाबाद 41(70,3×4), अभिषेक ताटे 11, धनराज परदेशी 5-13-1, सौरभ यादव 5-30-1).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...