पुणे, 1 ऑक्टोबर 2017- महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए-योनेक्स सनराईज पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन 12 वर्षाखालील चॅलेंज सिरीज स्पर्धेत मुलींच्या गटात चिन्मयी बागवे, अन्वेशा मूळगे यांनी तर, मुलांच्या गटात
प्रथमेश पाटील यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकित चिन्मयी बागवे हिने तिसऱ्या मानांकित सलोनी डेचा 8-6 असा सनसनाटी पराभव केला. अन्वेशा मूळगेने अकराव्या मानांकित गौरी माणगांवकरचा 8-4 असा पराभव केला. अव्वल मानांकित सोहा पाटीलने सहाव्या मानांकित सानिका भोगाडेचा टायब्रेकमध्ये 8-7(6) असा संघर्षपूर्ण पराभव केला.
मुलांच्या गटात बाराव्या मानांकित प्रथमेश पाटीलने पाचव्या मानांकित जय पवारचा 8-4 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. अव्वल मानांकित ऋषिकेश अय्यरने बाराव्या मानांकित ईशान देगंबरला 8-2 असे नमविले. सातव्या मानांकित आर्यन हूडने वेद पवारचा टायब्रेकमध्ये 8-7(5) असा पराभव केला. दुसऱ्या मानांकित
अर्णव पापरकरने आश्विन नरसिंघानीचा 8-1असा एकतर्फी पराभव करून उपांत्यपूर्व गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी:
सोहा पाटील(1)वि.वि.सानिका भोगाडे 8-7(6);
अन्वेशा मूळगे वि.वि.गौरी माणगांवकर(11) 8-4;
चिन्मयी बागवे वि.वि.सलोनी डे(3) 8-6;
रुमा गायकवारी(5)वि.वि.माही खोरे 8-1;
कश्मिरा सुम्बरे(12)वि.वि.दानिका फर्नांडो 8-3;
स्वरा काटकर(4)वि.वि.संचिता नगरकर(14) 8-2;
अपर्णा पताईत वि.वि.ईशान्य हतनकर(6)8-3;
त्रिशा मिश्रा(2)वि.वि.पूर्वा भुजबळ 8-6
मुले:
ऋषिकेश अय्यर(1)वि.वि.ईशान देगंबर(15)8-2;
सुधांशू सावंत(10)वि.वि.अर्णव कोकणे 8-3;
सर्वेश झावर वि.वि.पार्थ देवरूखकर 8-4;
अनमोल नागपुरे(9)वि.वि.राधेय शहाणे(6)7-3सामना सोडून दिला;
प्रथमेश पाटील(12)वि.वि.जय पवार(5)8-4;
केवल किरपेकर(16)वि.वि.देवादित्य मखिजा 8-5;
आर्यन हूड(7)वि.वि.वेद पवार 8-7(5);
अर्णव पापरकर(2)वि.वि.आश्विन नरसिंघानी(16)8-1.