पाचगणी, दि.1 ऑक्टोबर 2017ः रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या रवाईन हॉटेल दिवाळी स्मॅश सुपर सिरीज् 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात दक्ष अगरवाल, अथर्व आमरुळे, अर्जुन गोहाड या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
रवाईन हॉटेल, पाचगणी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत दक्ष अगरवालने गौतम काळेचा टायब्रेकमध्ये 6-3, 7-6(5) असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. अथर्व आमरुळेने प्रसाद इंगळेचा टायब्रेकमध्ये 6-4, 1-6, 7-6(3) असा पराभव करून आगेकूच केली. संदेश कुरळेने क्रिश वघानीला 6-3, 6-3 असे नमविले. अर्जुन गोहाडने साहिल तांबटचा 6-0, 6-1असा सहज पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले: पी.हितेश(तामिळनाडू) वि.वि.क्रिश टिपणीस(महा) 6-1, 6-3;
ऋषी जलोटा(उत्तरप्रदेश)वि.वि.आरव साने(महा) 7-5, 6-2;
दक्ष अगरवाल(महा)वि.वि.गौतम काळे(महा) 6-3, 7-6(5);
संदेश कुरळे(महा)वि.वि.क्रिश वघानी(महा) 6-3, 6-3;
अथर्व आमरुळे(महा)वि.वि.प्रसाद इंगळे(महा) 6-4, 1-6, 7-6(3);
अर्जुन गोहाड(महा)वि.वि.साहिल तांबट(महा) 6-0, 6-1;
साहेब सोदी(महा)वि.वि.क्रिस नासा(महा) 6-0, 6-1;
मुली:
श्रुनाया सिरसाट(महा)वि.वि.ऋतुजा तुडयेकर(महा)6-1 6-0;
विधी बर्मन(महा)वि.वि.तन्मयी तुडयेकर 6-1, 6-3.

