तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत वाडेश्वर विझार्डस संघाचा बाद फेरीत प्रवेश

Date:

वाडेश्वर विझार्डसच्या हिमांशू जैनचा स्पर्धेतील सर्वाधिक 107 गुणांचा ब्रेक

पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत गटसाखळी फेरीत ह गटात वाडेश्वर विझार्डस संघाने सलग तिसरा विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत ह गटात वाडेश्वर विझार्डस संघाने रॅक एम अप संघाचा 3-0असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. पहिल्या सामन्यात वाडेश्वर विझार्डसच्या आशुतोष पाधीने रॅक एम अपच्या मयंक भावसारचा 01-38, 67-05, 44-37, 57-44 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. दुसऱ्या सामन्यात ह्रितिक जैन याने सुमित सादुलकरचा 30-32, 74-42, 51-04, 61-39 असा पराभव करून वाडेश्वर विझार्डसला 2-0अशी आघाडी मिळवून दिली.तिसऱ्या लढतीत वाडेश्वर विझार्डसच्या हिमांशू जैन याने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत विशाल वायावर 19-47, 50-63, 42-37, 115(107)-15, 38-36 असा सनसनाटी विजय मिळवला. यामध्ये हिमांशू जैन याने चौथ्या फ्रेममध्ये 107 गुणांचा ब्रेक नोंदवून संघाचा विजय सुकर केला. अन्य लढतीत वाडेश्वर विझार्डस संघाने अनुक्रमे एमपी स्ट्रायकर्स व कॉर्नर पॉकेट शूटर्स संघाचा 2-1अशा सारख्याच फरकाने पराभव करून आपले बाद फेरीतील स्थान निश्चित केले.

ब गटात अरुण बर्वे, रोहित नारगोलकर, सलील देशपांडे यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी जायंट्स संघाने डेक्कन रुकीज संघावर 3-0 अशा फरकाने विजय मिळवला. ग गटात द बॉल हॉग्ज संघाने147 पूल अँड स्नूकर संघाचा 3-0 असा सहज पराभव केला. विजयी संघाकडून अशोक शांडिल्या, लौकिक पठारे, आदित्य अगरवाल यांनी सुरेख कामगिरी बजावली. तर,  दुसऱ्या  सामन्यात द बॉल हॉग्ज संघाने बीएसएसए मास्टर्स संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. तिसऱ्या सामन्यात द बॉल हॉग्ज संघाने पूना क्लब ब संघावर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. इ गटात केएसबीए संघाने डेक्कन रायनोजचा 2-1असा तर दुसऱ्या सामन्यात ऑटो पॉट्स संघाचा 2-1 असा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:

गट अ: क्यू मास्टर्स ब वि.वि.क्यू क्लब किलर्स 2-1(आर्यन राजहंस पराभूत वि.विशाल रजनी 00-48, 60-27, 16-27, 27-61; तुषार सावदी  वि.वि.प्रसाद पराडे 44-01, 54-33, 22-20; अभिषेक श्रीवास्तव वि.वि.अमरदीप घोडके 09-40, 54-62, 43-09, 55-41, 31-12);

गट ब: पीवायसी जायंट्स वि.वि.डेक्कन रुकीज 3-0(अरुण बर्वे वि.वि.श्रीवत्स शेवडे 30-40, 37-44, 44-33, 51-40, 40-21; रोहित नारगोलकर वि.वि.राजेंद्र आढाव 41-09, 11-61, 30-05, 60-24; सलील देशपांडे वि.वि.अश्विन पळणीतकर 22-35, 63-56, 18-26, 78-45, 53-21);

गट क: कॉर्नर पॉकेट क्युईस्ट वि.वि.क्यू क्लब ऍक्सेस् 3-0(राहुल सचदेव वि.वि.सत्चित जामगावकर 27-37, 115(100)-08, 45-10, 78-23; मुकुंद भराडिया वि.वि.निलेश पाटणकर 69(46)-00, 76-25, 50(50)-10; हसन बदामी वि.वि.अभिषेक बोरा 50-25, 61(61)-00, 42-11);

गट इ: केएसबीए वि.वि.डेक्कन रायनोज 3-0(योगेश कुमार वि.वि.प्रशांत पोवार 47-01, 62-38, 36-09; एम.एस.अरुण वि.वि.संतोष धर्माधिकारी  45-00, 65-18, 38-16; दक्ष रेड्डी वि.वि.विठ्ठल ढमाले 34-16, 83-30, 48-30);     

गट इ: केएसबीए वि.वि.ऑटो पॉट्स 2-1( एम.एस.अरुण वि.वि.पारस शहा 05-33, 53-52, 47-07, 59-60, 36-26;  दक्ष रेड्डी पराभूत वि.सिद्देश मुळे 28-35, 19-63, 46-15, 53-64; योगेश कुमार वि.वि.लव बोरीचा 19-40, 69-19, 40-11, 35-45, 49-16);

गट ग: द बॉल हॉग्ज वि.वि.बीएसएसए मास्टर्स 2-1(अशोक शांडिल्या वि.वि.अभिमन्यू गांधी 36-33, 67-55, 29-09; आदित्य अगरवाल पराभूत वि.आनंद रघुवंशी 37-40, 45-70, 17-44; लौकिक पठारे वि.वि.रोवीन डिसुझा 40-02, 31-52, 61-36, 73-69, 41-01);

गट ग: द बॉल हॉग्ज वि.वि.147 पूल अँड स्नूकर 3-0( अशोक शांडिल्या वि.वि.मनोज गाडगीळ 46-16, 70-25, 37-02;  लौकिक पठारे वि.वि.चैतन्य हळबे 28-18, 21-57, 35-42, 68-41, 49-00;  आदित्य अगरवाल वि.वि.सचिन बिचे 58-00, 70-10, 40-12);

गट ग: द बॉल हॉग्ज वि.वि.पूना क्लब ब 3-0(आदित्य अगरवाल वि.वि.पंकज परमार 59-07, 74-09, 80-18; रोहन साकळकर वि.वि.कुणाल वासवानी 39-09, 51-10, 18-27, 59-25; लौकिक पठारे वि.वि.कुमार शिंदे 35-14, 58-78, 35-25, 74-67);

गट ह: वाडेश्वर विझार्डस वि.वि.रॅक एम अप 3-0(आशुतोष पाधी वि.वि.मयंक भावसार 01-38, 67-05, 44-37, 57-44; ह्रितिक जैन वि.वि.सुमित सादुलकर 30-32, 74-42, 51-04, 61-39; हिमांशू जैन वि.वि.विशाल वाया 19-47, 50-63, 42-37, 115(107)-15, 38-36);

गट ह: वाडेश्वर विझार्डस वि.वि.एमपी स्ट्रायकर्स 2-1(आशुतोष पाधी वि.वि.केतन चावला  19-39, 64-35, 37-33, 67-55; ह्रितिक जैन वि.वि.भरत सिसोडिया 34-16, 80-11, 37-24; हिमांशू जैन पराभूत वि.अनुराग गिरी 06-56, 80-00, 44-16, 50-60, 17-38);

गट ह: वाडेश्वर विझार्डस वि.वि.कॉर्नर पॉकेट शूटर्स 2-1(आशुतोष पाधी पराभूत वि.साद सय्यद 05-45, 14-63, 02-32; हिमांशू जैन वि.वि.तहा खान 00-(52)61, 83-47, 43-21, 77-08; ह्रितिक जैन वि.वि.संकेत मुथा 43-17, 72-04, 45-33);

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोदींची 8 आखाती देशांशी चर्चा, दुबई आणि अबू धाबीहून 2000+ भारतीय परतले

नवी दिल्ली- पंतप्रधान मोदींनी सोमवारी भारतीय समुदायाच्या लोकांच्या सुरक्षेबाबत...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन इराणशी चर्चा करणार:मध्य पूर्वेतील देशांवरील हल्ले रोखणे हे उद्दिष्ट

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन इराणशी चर्चा करणार आहेत. मंगळवारी...

२८ आणि २९ मार्चला महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन

चौथ्या विजेतेपदासाठी भाग्यश्री फंड उत्सुक ४२ जिल्ह्यांच्या संघांचे ४००हून अधिक...

चंद्रकांतदादा पाटील यांची सीआयएसएफच्या जवानांसोबत होळी साजरी

जवानांच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद पाहून मन समाधानाने भरुन आले-...