विविध स्तरावर सातत्यानं चांगली कामगिरी करणाऱ्या ऐश्वर्या गाडेकर(मध्यरक्षक), ऐश्वर्या जगताप(स्ट्रायकर), स्मिधी खोकले(मध्यरक्षक) व अंजली बारके(गोलरक्षक) यांची राष्ट्रीय फुटबॉल संघात वर्णी लागली. पीडीएफएच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असलेल्या या खेळाडूंची निवड झाल्यामुळे आम्हांला खूप आनंद झाला असल्याचे पीडीएफएचे उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी यांनी सांगितले.
ऐश्वर्या गाडेकर ही फर्गुसन महाविद्यालयात अकरावी इयत्तेत शिकत असून पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या(पीडीएफए) मैदानावर ती प्रशिक्षक मोहन दास यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. ऐश्वर्या जगताप ही विद्या हायस्कुल, बालेवाडी येथे दहावी इयत्तेत शिकते. स्मिधी खोकले ही गुरूकूल स्कुल, शिवाजीनगर येथे दहावी इयत्तेत शिकत असून आहे. तर अंजली बारके ही सिंहगड स्प्रींगडेल, आंबेगाव येथे नववी इयत्तेत शिकते. ऐश्वर्या जगताप, स्मिधी खोकले, अंजली बारके या तीनही खेळाडू पीडीएफएच्या सनी अजमेकर यांच्या मार्गदर्शमाखाली सराव करतात. मुंबई येथे १७ ते २६ जुलै २०१७ या कालावधीत सुरू असलेल्या सराव शिबिरात त्या सराव करत आहेत.