पुणे: पुण्यातील लक्ष्य या क्रीडा क्षेत्रासाठी कार्य करणाऱ्या एनजीओला देशांतील क्रीडा क्षेत्रासाठीची सर्वोत्तम एनजीओ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
बंगळूर येथे पार पडलेल्या जागतिक सीएसआर दिनानि
याचप्रसंगी इतर गटातील पुरस्कारही प्रदान करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये सीएसआरमधील सर्वोत्तम संस्था, कॉर्पोरेट कम्युनिकेशन व सौर ऊर्जा, ऊर्जेचा पुनर्वापर व पर्यावरण या पुरस्कारांचा समावेश होता. क्रीडा क्षेत्रासाठी काहीतरी भरीव कार्य करण्याच्या इच्छेने पुण्यातील हौशी व उत्साही क्रीडा प्रेमींनी भारताला जागतिक क्रीडा विश्वात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी पुण्यामध्ये फेब्रुवारी २००९च्या दरम्यान लक्ष्य या संस्थेची स्थापना करण्यात आली. या ना नफा ना तोटा तत्वावरील या एनजीओ संस्थेने विविध क्रीडा प्रकारांतील १०० हुन अधिक गुणवान क्रीडा पटूंची विविध चाचण्यांमधून निवड करण्यात आली. त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी सर्व बाबतीत त्यांना साहाय्य केले आणि जागतिक स्तरापर्यंत पोहोचेपर्यँत त्यांचा पाठपुरावा केला. सध्या विविध उद्योगसमूहांच्या साहाय्याने २६ नामवंत क्रीडा पटूंना लक्ष्यच्या वतीने सर्वोतोपरी पाठिंबा देण्यात येत आहे. त्यामुळे हे खेळाडू उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत.