क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघांचा अंतिम फेरीत प्रवेश

Date:

पुणे,- पीवायसी हिंदु  जिमखाना क्लब यांच्या  तर्फे पीवायसी करंडक 14वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत  व्हेरॉक  वेंगसरकर  क्रिकेट  अकादमी संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.  

डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत प्रसन्न पवारच्या 62 धावांच्या बळावर व्हेरॉक  वेंगसरकर  क्रिकेट अकादमी  संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 7 गडी राखून दणदणीत पराभव करत अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा खेळताना क्रिश शहापुरकरच्या एकाकी 85 धावांच्या जोरावर क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने 45 षटकात 8 बाद 147 धावा केल्या. व्हेरॉक  वेंगसरकर  क्रिकेट अकादमी संघाच्या कबीर भट्टचार्जीने 35 धावात 2 गडी बाद करत क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा डाव 147 धावांत रोखला. 147 धावांचे आव्हान प्रसन्न पवारच्या 62, शार्दुल विनोदेच्या 34 व  वैभव अगमच्या नाबाद 24 धावांच्या बळावर व्हेरॉक  वेंगसरकर  क्रिकेट अकादमी संघाने केवळ 27.4 षटकात 3 बाद 150 धावा करून सहज पुर्ण करत अंतिम फेरीत धडक मारली. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी

क्लब ऑफ महाराष्ट्र- 45 षटकात 8 बाद 147 धावा(क्रिश शहापुरकर 85, विवेक टिपरे 17, कबीर भट्टचार्जी 2-35, भार्गव महाजन 1-35, ओंकार राजपुत 1-34, साहिल सावंत 1-6) पराभूत वि व्हेरॉक  वेंगसरकर  क्रिकेट अकादमी- 27.4 षटकात 3 बाद 150 धावा(प्रसन्न पवार 62, शार्दुल विनोदे 34, वैभव अगम नाबाद 24, साहिल कड 1-26, पार्थ कांबळे 1-55, तेजस शिंदे 1-25) सामनावीर- प्रसन्न पवार

व्हेरॉक  वेंगसरकर  क्रिकेट अकादमी  संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...