Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

टेनिस अजिंक्यपद 2018 स्पर्धेत एकेरीत भारताच्या सिद्धांत बांठियाला विजेतेपद थायलंडच्या मनचया सवांगकिइला दुहेरी मुकुट;

Date:

पुणे-एचसीएल पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या तर्फे आयोजित आणि आंतरराष्ट्रीय टेनिस संघटना(आयटीएफ), आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना(एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दुसऱ्या एचसीएल आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात एकेरी गटात भारताच्या सिद्धांत बांठिया याने विजेतेपद संपादन केले. तर, मुलींच्या गटात थायलंडच्या मनचया सवांगकिइ हिने दुहेरी व एकेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात भारताच्या चौथ्या मानांकित सिध्दांत बांठीयाने आपली विजयी मालिका कायम ठेवत दुसऱ्या मानांकित उझबेकिस्तानच्या सेर्गेय फोमीनने 6-1, 6-4 असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. हा सामना 1तास 5मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये सिद्धांतने सुरेख सुरुवात करत दुसऱ्याच गेममध्ये सेर्गेयची सर्व्हिस ब्रेक केली व  2-0अशी आघाडी घेतली. सामन्याच्या अखेरपर्यँत आपली आघाडी कायम ठेवत सिद्धांतने सहाव्या गेममध्ये सेर्गेयची पुन्हा एकदा सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-1असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसरा सेट फार रंगतदार ठरला. या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले व चौथ्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या त्यामुळे सामन्यात 2-2 अशी स्थिती निर्माण झाली. सिद्धांतने पुढच्याच गेममध्ये सेर्गेयची सर्व्हिस भेदली व आघाडी घेतली. सहाव्या गेममध्ये सिद्धांतने 15-30 असे गुण असताना दोन बिनतोड सर्व्हिस केल्या व स्वतःची राखत 4-2अशी आघाडी मिळवली. त्यानंतर सेर्गेयने पिछाडीवरून जोरदार पुनरागमन करत आठव्या गेममध्ये सिद्धांतची सर्व्हिस रोखली व सामन्यात 4-4अशी बरोबरी साधली. पण आघाडीवर असलेल्या सिद्धांतने आपली विजयी घौडदौड कायम ठेवत नवव्या गेममध्ये सेर्गेयची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-2असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. लक्ष्य-भारत फोर्ज यांचा पाठिंबा असलेला सिद्धांत हा  पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे आणि केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. यावेळी विजेतेपदानंतर आनंद व्यक्त करताना सिद्धांत म्हणाला कि, माझ्या कुमार गटांतील कारकिर्दीतील हा सर्वोत्तम विजय आहे. मला हि स्पर्धा जिंकायचीच होती. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच मी सर्व सामने आत्मविश्वासाने खेळले असून डेक्कन जिमखाना येथील टेनिस कोर्ट हे माझ्या खेळाच्या शैलीशी सुसंगत ठरते. स्पर्धेतील उपांत्य व अंतिम फेरीच्या लढती माझ्यासाठी अटीतटीच्या होत्या. कारण दोन्ही खेळाडू अव्वल मानांकित खेळाडू होते. त्यामुळे माझ्यावर दडपण तर होतेच, पण त्याचबरोबर या कोर्टवर खेळण्याची सवय असल्यामुळे मी त्यानुसार माझा खेळ केला. 

मुलींच्या गटात अंतिम फेरीत थायलंडच्या तिसऱ्या मानांकित मनचया सवांगकिइने इंडोनेशियच्या चौथ्या मानांकित प्रिस्का मॅडेलिन नुगरोचा टायब्रेकमध्ये 7-6(5), 6-3असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सामन्यात पहिल्या सेटमध्ये मनचयाने दुसऱ्या, चौथ्या व आठव्या गेममध्ये प्रिस्काची सर्व्हिस रोखली व हा सेट टायब्रेकमध्ये 7-6(5)असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मनचयाने अधिक भक्कम सुरुवात करत प्रिस्काची पहिल्या, तिसऱ्या व सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-3अशा फरकाने जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मनचया हि सुपाणबुरी स्पोर्ट्स शाळेत दहावी इय्यतेत शिकत असून  पिरॅमिड टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक योदचाई काँग कुंत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

एचसीएल कॅर्पोरेशनचे  धोरण व्यवस्थापकीय अधिकारी व शिव नादर फाउंडेशनचे सुंदर महालिंगम म्हणाले की, भारताचे टेनिस खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव नावलौकिकास आणत आहेत. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून पुढच्या पिढीला यश मिळवण्याकरिता आम्ही प्रोत्साहन देत आहोत. गेल्या काही वर्षांत एचसीएलने अनेक उपक्रम राबवून प्रतिभावान युवा खेळाडूंना सर्वोत्तम खेळ करण्यासाठी व खेळात सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. यापैकी काही खेळाडू भविष्यात आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील, अशी मला आशा आहे.
 
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, यावर्षीच्या एचसीएल आशियाई  टेनिस अजिंक्यपद 2018 स्पर्धा उत्तम पध्दतीने पार पडली याचा आम्हाला खूप आनंद झाला आणि मी विजेत्या, उपविजेत्या तसेच सहभागी खेळाडूंचे अभिनंदन करतो. ही सन्माननीय स्पर्धा सलगद दोन वर्षे पुण्यात घेतल्याबद्दल सहकार्यासाठी एचसीएलचे आभार मानू इच्छितो आणि येत्या काही वर्षांमध्ये एचसीएलसह अनेक स्पर्धा आयोजित करण्याची आशा करतो. “

स्पर्धेतील एकेरीतील विजेत्या खेळाडूंना 280 आयटीएफ गुण व करंडक, तर उपविजेत्या खेळाडूंना 170 आयटीएफ गुण व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ऑलंम्पियन व आशियाई सुवर्णपदक विजेता दत्तू भोकनळ, एचसीएलचे सुंदर महालिंगम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीएमडीटीएचे खजिनदार कौस्तुभ शहा, स्पर्धा सुपरवायझर लीना नागेशकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी: मुले:
सिध्दांत बांठीया(भारत)(4)वि.वि.सेर्गेय फोमीन(उझबेकिस्तान)(2)6-1, 6-4

मुली:
मनचया सवांगकिइ(थायलंड)(3)वि.वि.प्रिस्का मॅडेलिन नुगरो(इंडोनेशिया)(4)7-6(5), 6-3.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...