पुणे,19 सप्टेंबर 2017 : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात मारूती सुझुकी ऑटोप्रिक्स 2017 (सीझन 1) च्या ऑटोक्रॉस फॉरमॅटची दुसरी फेरी होत आहे.
या चॅम्पियनशीपची पहिली फेरी बंगळुरूमध्ये 10 सप्टेंबर रोजी पार पडली असून पश्चिम विभागातील पहिला विजेता शोधण्यासाठी 22 सप्टेंबर रोजी पुण्यात दुसरी फेरी हिंदुस्थान अँटीबायोटिक्स एक्झिबिशन ग्राऊंड,पिंपरी येथे होणार आहे.
5 महिने चालणार्या या स्पर्धेमध्ये बंगळुरू,पुणे,कोईम्बतूर,चंदीगड,इंदौर,गुडगाव आणि गुवाहाटी या 7 शहरांमधील नवोदित रेसर्स व मोटरस्पोर्टसमध्ये उत्साही असलेले सहभागी स्पर्धक होतील.ग्रेटर नोएडा येथील बुध्द इंटरनॅशनल सर्किट येथे मारूती सुझुकी ऑटोप्रिक्स चॅम्पियनशीप या प्रतिष्ठित किताबासाठी 6 वेगवेगळ्या प्रकारात लढतील.
मारूती सुझुकी ऑटोप्रिक्स 2017 (सीझन 1) हे अॅमॅच्युअर मोटरस्पोर्टस् उत्साहींसाठी त्यांचे मोटरींगमधील कौशल्य सुधारण्यासाठी एक योग्य व्यासपीठ असून अधिक कठिण रॅलींगच्या फॉरमॅटसमध्ये जाण्याआधी सुरक्षित वातावरणात आपले कौशल्य सुधारत या साहसाचा अनुभव घेता येईल.
दुसर्या फेरीचा समारोप 24 सप्टेंबरला पुण्यात पारितोषिक वितरण समारंभाने होईल व यातील विजेते शहराचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय चॅम्पियनशीपमध्ये करतील.
मारूती सुझुकी ऑटोप्रिक्स 2017 (सीझन 1) च्या राष्ट्रीय विजेत्याला 29 जानेवारी ला नोएडा येथे होणार्या अंतिम फेरीनंतर मारूती सुझुकी स्वीफ्ट हे बक्षीस मिळेल,तर शहरातील फेर्यांमध्ये विजेत्यांना रोख रक्कम स्वरूपात पुरस्कार मिळतील.