पुणे: हेमंत पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन व भारत अगेंस्ट करप्शनच्या सहयोगाने आयोजित हेमंत पाटील महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत सायली लोणकर(76धावा) हिने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर शिवनेरी पँथर्स संघाने एचपी सुपर किंग्स संघाचा 6 गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.
व्हिजन क्रिकेट अकादमी, सिंहगड रोड येथील क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम लढतीत पहिल्यांदा खेळताना एचपी सुपर किंग्स संघाने 20षटकात 6बाद 150धावा केल्या. यात सई पुरंदरेने 30धावा, पूनम खेमनारने 25धावा, ऋतुजा गिलबिलेने 21धावा, तेजश्री ननावरेने 18धावा, काजल निकलेने 16धावा व प्रियांका घोडकेने 12धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. शिवनेरी पँथर्स कडून आदिती जोशी(2-13), किरण नवगिरे(1-28), भूमिका उंबरजे(1-17)यांनी सुरेख गोलंदाजी केली. शिवनेरी पँथर्स संघाने हे आव्हान 19.5षटकात 4गड्यांच्या बदल्यात151धावा करून पूर्ण केले. यामध्ये सायली लोणकरने 54चेंडूत 7चौकार व 1षटकारासह 76धावा, गौतमी नाईकने 34 चेंडूत 5चौकारांसह 40धावा केल्या. सायली लोणकर(74धावा)व गौतमी नाईक(40धावा)यांनी पहिल्या गडयासाठी चेंडूत 50धावांची भागीदारी करून संघाला ऑरेख सुरुवात करून दिली. त्यानंतर भूमिका उंबरजेने 14धावा, किरण नवगिरेने 11धावा करून संघाला विजय मिळवून दिला.सामन्याची मानकरी सायली लोणकर ठरली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
एचपी सुपर किंग्स: 20षटकात 6बाद 150धावा(सई पुरंदरे 30(25,6×4), पूनम खेमनार 25(19,3×4), ऋतुजा गिलबिले 21(24,2×4), तेजश्री ननावरे 18(22,1×4), काजल निकले 16(19,1×4), प्रियांका घोडके 12, आदिती जोशी 2-13, किरण नवगिरे 1-28, भूमिका उंबरजे 1-17)पराभूत वि.शिवनेरी पँथर्स: 19.5षटकात 4बाद 151धावा(सायली लोणकर 76(54,7×4,1×6), गौतमी नाईक 40(35,5×4), भूमिका उंबरजे 14(11,1×4), किरण नवगिरे 11(14), पूजा जैन 2-24, आरती भेनवाल 1-21);सामनावीर-सायली लोणकर.
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: सायली लोणकर(229धावा);
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: प्रियांका घोडके(8विकेट);
मालिकावीर: पूनम खेमनार(266धावा व 4 विकेट).