पुणे: हेमंत पाटील स्पोर्ट्स फाउंडेशन व भारत अगेंस्ट करप्शन यांच्या सहयोगाने आयोजित हेमंत पाटील विमेन्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एचपी सुपर किंग्स, तोरणा टायगर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
सिंहगड रोड येथील व्हिजन क्रिकेट अकादमी येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पूनम खेमनारने केलेल्या 78धावांच्या खेळीच्या जोरावर एचपी सुपर किंग्स संघाने सिंहगड स्टार्स संघाचा केवळ 3 धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना एचपी सुपर किंग्स संघाने 20षटकात 7बाद 140धावा केल्या. यात पूनम खेमनारने 57 चेंडूत 78धावा व सई पुरंदरेने 29 चेंडूत 23धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सिंहगड स्टार्स संघाला 20षटकात 8बाद 137धावापर्यंतच मजल मारता आली.यामध्ये सारिका कोळी 60, श्रद्धा पोखरकर नाबाद 15, सोनल पाटील 14, तेजश्री कदम 12यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. एचपी सुपर किंग्सकडून प्रियांका घोडके(3-21), तेजश्री ननावरे(1-14), प्रियांका भोकरे (1-20)यांनी सुरेख गोलंदाजी केली.सामन्याची मानकरी पूनम खेमनार ठरली.
दुसऱ्या सामन्यात श्वेता जाधव(92धावा)हिने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर तोरणा टायगर्स संघाने रायगड रॉकर्स संघाचा 72 धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला. श्वेता जाधवने 61चेंडूत 16चौकारांसह 92धावा, नेहा बडवाईकने 41 चेंडूत 6चौकारांसह 44धावा यांनी पहिल्या गडयासाठी 69चेंडूत 102धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनंतर श्वेता जाधवने(92धावा) व चार्मी गवई नाबाद (27धावा)यांनी दुसऱ्या गडयासाठी 28चेंडूत 50धावांची भागीदारी संघाला 192अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली. याच्या उत्तरात रायगड रॉकर्सचे आव्हान 20षटकात 5बाद 121धावावर संपुष्टात आले. यात उत्कर्ष पवार 35, पार्वती बाकळे 31, कश्मिरा शिंदे 17यांची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही तोरणा टायगर्सकडून भूमिका फाळके(1-9), ख़ुशी मुल्ला(1-19), वैष्णवी पाटील(1-22), रोहिणी माने(1-26)यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
एचपी सुपर किंग्स: 20षटकात 7बाद 140धावा(पूनम खेमनार 78(57,9×4), सई पुरंदरे 23(29,1×4), मनाली जाधव 2-16, वैष्णवी रावलीया 1-6, सायली अभ्यंकर 1-33, श्वेता खटाळ 1-33)वि.वि.सिंहगड स्टार्स: 20षटकात 8बाद 137धावा(सारिका कोळी 60(42,7×4), श्रद्धा पोखरकर नाबाद 15(10,2×4), सोनल पाटील 14(19), तेजश्री कदम 12, प्रियांका घोडके 3-21, तेजश्री ननावरे 1-14, प्रियांका भोकरे 1-20);सामनावीर-पूनम खेमनार;
तोरणा टायगर्स: 20षटकात 1बाद 193धावा(श्वेता जाधव 92(61,16×4), नेहा बडवाईक 44(41,6×4), चार्मी गवई 27(21,4×4), मानसी जाधव 1-15)वि.वि.रायगड रॉकर्स: 20षटकात 5बाद 121धावा(उत्कर्ष पवार 35(38,2×4), पार्वती बाकळे 31(29,5×4), कश्मिरा शिंदे 17(23,2×4), भूमिका फाळके 1-9, ख़ुशी मुल्ला 1-19, वैष्णवी पाटील 1-22, रोहिणी माने 1-26);सामनावीर-श्वेता जाधव.



