पुणे: स्पोर्टीलव व महाराष्ट्र क्रीडा यांच्या तर्फे 6व्या कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धेत सेल २ वर्ल्ड संघाने फुजीस्तु संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, लवळे क्रिकेट मैदान येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात हर्षद शोखच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर सेल २ वर्ल्ड संघाने फुजीस्तु संघाचा 8 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. पहिल्यांदा खेळताना हर्षद शोखच्या अचूक गोलंदाजी पुढे फुजीस्तु संघ 9 षटकात 7 बाद 16 धावांत गारद झाला. 16 धावांचे लक्ष राजिंदर पानेसरच्या नाबाद 10 तर प्रतिक हर्षेच्या नाबाद 12 धावांसह सेल २ वर्ल्ड संघाने केवळ 3.4 षटकात 1 बाद 17 धावांसह पुर्ण केले. हर्षद शेख सामनावीर ठरला.
विजेत्या सेल २ वर्ल्ड संघाला करंडक व 35,000/- तर उपविजेत्या फुजीस्तू संघाला करंडक व 20,000/- व मालीकावीर नितिन चौधरीला 5000/- अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सिंबायोसीस स्कुल ऑफ कलिनरी आर्टसे संचालक अतुल ए गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: फुजीस्तु: 9 षटकात 7 बाद 16 धावा(मधु कामत 17, हर्षद शोख 3-12) पराभुत वि सेल २ वर्ल्ड – 3.4 षटकात 1 बाद 17 धावा(राजिंदर पानेसर नाबाद 10, प्रतिक हर्षे नाबाद 12, नितिन चौधरी 1-6) सामनावीर- हर्षद शेख
सेल टू वर्ड संघाने 8 गडी राखून सामना जिंकला.
इतर पारितोषिके:
सर्वोत्कृष्ट फलंदाज: अक्षय गवळी (सेल टू वर्ड)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज: प्रतिक हर्षे (सेल टू वर्ड)