पुणे- ग्रीन बॉक्स् यांच्या तर्फे आयोजीत 4थ्या ग्रीन बॉक्स् मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत बायसंन्स, लॅन्सर्स, बोल्टस, पलाडियन्स, रेंजर्स, समुराईज, ग्लॅडिएटर्स, रेझरबँक्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
कॅसल रॉयल, एबीआयएल कॅंपस रेंज हिल्स, भोसले नगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अतितटीच्या झालेल्या लढतीत निखिल माळीच्या हॅट्रीक कामगिरीच्या जोरावर डीएसके पलाडियन्स संघाने हिलीओस सेन्चुरियन्स संघाचा 4-3 असा पराभव केला. केएसएच बोल्टस संघाने युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स संघाचा तर गोयल गंगा लॅन्सर्स संघाने एबीआयएल ऍझटेक्स संघाचा अनुक्रमे 2-0 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
माधव लिमये ग्रुप अँड कॅफे गुड लक रेंजर्स संघाने चिताज नाईट्स संघाचा तर निओट्रीक(सिपी)फिनोलेक्स रेझरबँक्स संघाने एसएस रॉय वायकिंग्ज संघाचा 1-0 असा पराभव केला. देवेंद्र कोरोडीच्या दोन गोलांच्या जोरावर रोहन बिल्डर्स(इंडिया)प्रायव्हेट लिमिटेड बायसंन्स संघाने आयएमई फायरबर्डस संघाचा 3-0 असा दणदणीत पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
डीएसके पलाडियन्स: 4(निखिल माळी 4,9,17 मी, यश सरदेसाई 12मी) वि.वि हिलीओस सेन्चुरियन्स: 3(शॉन थॅमसराजे 14, 19मी, लिऑन नेसामनी 8मी)
केएसएच बोल्टस: 2 (यश चव्हाण 12मी, साजल कदम 16मी) वि.वि युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स: 0
गोयल गंगा लॅन्सर्स: 2 ( शॉन बॉब 8मी, पृथ्विराज सातव 14मी) वि.वि एबीआयएल ऍझटेक्स: 0
माधव लिमये ग्रुप अँड कॅफे गुड लक रेंजर्स: 1(निखिल नारायणन 9मी) वि.वि चिताज नाईट्स: 0
निओट्रीक(सिपी)फिनोलेक्स रेझरबँक्स: 1(अक्षय नायर 13मी) वि.वि एसएस रॉय वायकिंग्ज: 0;
रोहन बिल्डर्स(इंडिया)प्रायव्हेट लिमिटेड बायसंन्स: 3(देवेंद्र कोरोडी 7, 19मी, कृष्णा पाटील 15मी स्वयं गोल) वि.वि आयएमई फायरबर्डस: 0
अभयराज शिरोळे अँड असोसीएट्स समुराईज: 1(विपुल त्रिवेदी 11मी) बरोबरी वि एमपी ग्रुप मावरिक्स: 1(शॉन अर्लांड 15मी)
रावेतकर ग्लॅडिएटर्स: 3(रोईथ जयसिंघानी 6मी, कौशल वालेचा 9मी, जयंत कापसे 15मी स्वयं गोल) वि.वि परांजपे स्पार्टन्स: 1( सौरभ शिंदे 12मी)