पुणे: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे 14व्या पीएसपीबी आंतर युनिट बिलियर्ड्स अँड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत ओएनजीसी संघाने बीपीसीएलचा 3-0असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे बिलियर्ड्स अँड स्नूकर हॉलमध्ये सुरु असलेल्या या बिलियर्ड्स स्पर्धेत सांघिक गटात अंतिम फेरीत रुपेश शहा, आलोक कुमार यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर गतविजेत्या ओएनजीसी संघाने बीपीसीएल संघाचा 3-0असा पराभव केला. रुपेश शहाने सामन्यात सुरेख सुरवात करत आघाडी घेतली. त्यानंतर एस श्रीकृष्णा पुनगरमान करत आघाडी भरून काढली. 48च्या ब्रेकवर असताना एस श्रीकृष्णा सोपा पॉट मिस केला. त्यानंतर रुपेश शहाने वर्चस्व कायम राखत 77 गुणांचा ब्रेक नोंदवत हि फ्रेम एस श्रीकृष्णा विरुद्ध 202(77)-100अशी जिंकून संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात आलोक कुमार आणि मनन चंद्रा यांच्यात अतितटीचा सामना झाला. मननने 37गुणांच्या ब्रेकने चांगली सुरुवात केली. त्यानंतर आलोकने संधी मिळताच उपयुक्त ब्रेक नोंदविला व सामना 200(83)-111अशा फरकाने जिंकून आघाडी कायम ठेवली. विजयासाठी 9 गुणांच्या फरकाची गरज होती. त्यासाठी विश्वविजेता पंकज अडवाणी तिसऱ्या सामना खेळला. त्याने देवेंद्रविरुद्ध हि औपचारिकता पूर्ण केली.
3 व 4थ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात
ध्वज हरिया, आदित्य मेहता यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर इंडियन ऑईल संघाने जीएआयएलचा 2-1 असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.
सांघिक स्नूकर गटात उपांत्यपूर्व फेरीत जीएआयएल संघाने एनआरएलचा 2-0 असा पराभव केला. आशुतोष पाधीने दुर्लव बोराचा 82-17, 77-12 असा तर इशप्रित चड्डाने स्वप्नव दत्ताचा 77-12, 82-02असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: सांघिक गट:
ओएनजीसी वि.वि.बीपीसीएल 3-0(रुपेश शहा वि.वि.एस श्रीकृष्णन 202(77)-100; आलोक कुमार वि.वि.मनन चंद्रा 200(83)-111; पंकज अडवाणी वि.वि.देवेंद्र जोशी 9-5);
3 व 4थ्या क्रमांकासाठी लढत:
इंडियन ऑईल वि.वि.जीएआयएल 2-1(ब्रिजेश दमानी पराभूत वि.इशप्रित चड्डा 37-200; ध्वज हरिया वि.वि.आशुतोष पाधी 200-29; आदित्य मेहता वि.वि.अशोक यादव 200-34);
सांघिक गट: स्नूकर: उपांत्यपूर्व फेरी:
जीएआयएल वि.वि.एनआरएल 2-0(आशुतोष पाधी वि.वि.दुर्लव बोरा 82-17, 77-12; इशप्रित चड्डा वि.वि.स्वप्नव दत्ता 77-12, 82-02);
इंडियन ऑईल वि.वि.ऑईल 2-0(आदित्य मेहता वि.वि.जे फुकन 119(51,67)-00, 75-10; लक्ष्मण रावत वि.वि.रुद्र दत्ता 95-04, 81-06)