पुणे- ग्रीन बॉक्स् यांच्या तर्फे आयोजीत 4थ्या ग्रीन बॉक्स् मिनी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत आयएमई फायरबर्डस्, डीएसके पॅलाडीन्स, एमपी ग्रुप मावेरीक्स, एसएस रॉय वायकिंग्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला.
कॅसल रॉयल , एबीआयएल कॅंपस रेंज हिल्स, भोसले नगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सुरज थापाच्या धडाकेबाज 3 गोलच्या जोरावर चेताज नाईट्स संघाने गोयल गंगा लॉन्सर्स संघाचा 3-0 असा सहज पराभव करत आगेकूच केली.
यश चव्हाण , अझर खान व येलसन नाईगम यांच्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर केएसएच बोल्टस् संघाने रावेतकर ग्लॅडीअटर्स संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. एमपी ग्रुप मावेरीक्स संघाने रोहन बिल्डर्स(इंडीया)प्रा.लीमीटोड बायसन्स संघाचा 4-1 असा पराभव केला.
एसएस रॉय वायकिंग्स संघाने
माधव लिमये ग्रुप अॅन्ड कॅफे गुडलक-रेंजर्स संघाचा 2-1 असा,
आयएमई फायरबर्डस् संघाने
परांजपे स्पार्टन्स् संघाचा 2-0 असा पराभव केला.
नेओट्रीक फिनोलेक्स्(सीपी) -रोझोरबॅक्स संघाचा तर
युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स संघाने
अभिराज शिरोळे अॅन्ड असोसीएट्स समिराईज् संघाचा अनुक्रमे 1-0 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
चेताज नाईट्स- 3(सुरज थापा 2,7,14मी) वि.वि गोयल गंगा लॉन्सर्स- 0
केएसएच बोल्टस्- 3(यश चव्हाण 2मी, अझर खान 12मी, येलसन नाईगम 15मी) वि.वि रावेतकर ग्लॅडीअटर्स- 0
एसएस रॉय वायकिंग्स- 2(साहिल भोकरे 8मी, ओमकार यादव 16मी) वि.वि माधव लिमये ग्रुप अॅन्ड कॅफे गुडलक-रेंजर्स- 1(नील संघवी 2मी)
आयएमई फायरबर्डस्- 2(तन्मय शिरोडकर 5मी, गितेश मुलचंदानी 14मी) वि.वि परांजपे स्पार्टन्स्- 0
डीएसके पॅलाडीन्स- 1(निखिल माळी 5मी) वि.वि नेओट्रीक फिनोलेक्स्(सीपी) -रोझोरबॅक्स- 0
एमपी ग्रुप मावेरीक्स- 4(शवन अर्लांड 3मी, अदित्य अय्यर 10मी, यश जैन 12मी) वि.वि रोहन बिल्डर्स(इंडीया)प्रा.लीमीटोड बायसन्स- 1(हितेश लुल्ला 9मी)
एबीआयएल अॅझटेक्स- 2(सुनिल गुप्ता 6मी, कौस्तूभ सुर्यवंशी 10मी) बरोबरी वि हिल्योज् सेंच्यूरियन्स- 2(फ्रॅंकी डेविड 4मी, जीवन नागले 18मी)
युवराज चव्हाण कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड गनर्स- 1(निशिथ हेगडे 8मी) वि.वि अभिराज शिरोळे अॅन्ड असोसीएट्स समिराईज्- 0