पुणे- आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत इन्फोसिस संघाने अॅटॉस् संघाचा तर अॅमडॉक्स संघाने सिमेंस संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आशय पालकरच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर इन्फोसिस संघाने अॅटॉस् संघाचा 7 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना आशय पालकर व थॉमसन स्टेव यांच्या अचूक गोलंदाजीपुढे अॅटॉस् संघाचा डाव 20 षटकात सर्वबाद 129 धावांत रोखला. 129 धावांचे लक्ष संदिप सांघाईच्या जलद 41 धावांसह इन्फोसिस संघाने केवळ 18.2 षटकात 3 बाद 130 धावा करून सहज पुर्ण केले. आशय पालकर 22 धावांत 4 गडी बाद करणारा आशय पालकर सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत आवेश सय्यदच्या जलद अर्धशतकी खेळीच्या जोरावर अॅमडॉक्स संघाने सिमेंस संघाचा 34 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना अॅमडॉक्स संघाने 20 षटकात सर्वबाद 192 धावा केल्या. यात रोहित लालवानीने 30 धावा करून आवेशला सुरेख साथ दिली. 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संदिप कानिटकरच्या 40 धावा संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत व ह्रषद खटावकर, भावनीश कोहली व मितेश मयेकर यांच्या अचूक गोलंदाजीपुढे सिमेंस संघ 18.5 षटकात सर्वबाद 158 धावांत गारद झाला. आवेश सय्यद सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
अॅटॉस्- 20 षटकात सर्वबाद 129 धावा(विघ्नेश मोहन 33, महेश भोसले 31, आशय पालकर 4-22, थॉमसन स्टेव 3-27) पराभूत वि इन्फोसिस- 18.2 षटकात 3 बाद 130 धावा(प्रभज्योत सिंग 23, संदिप सांघाई 41(24), आशय पालकर 23, साईनाथ शिंदे नाबाद 23, विघ्नेश मोहन 2-27) सामनावीर- आशय पालकर
इन्फोसिस संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.
अॅमडॉक्स- 20 षटकात सर्वबाद 192 धावा(आवेश सय्यद 56(27), रोहित लालवानी 30, अभिषेक पाटणकर 23, राजेश धालपे 3-30, संदिप कानिटकर 2-24, संजय पाटील 2-19) वि.वि सिमेंस- 18.5 षटकात सर्वबाद 158 धावा(हिमांशू अगरवाल 34, संदिप कानिटकर 40(25), राजेश धालपे 23, ह्रषद खटावकर 3-16, भावनीश कोहली 3-22, मितेश मयेकर 2-51) सामनावीर- आवेश सय्यद
अॅमडॉक्स संघाने 34 धावांनी सामना जिंकला.