पुणे,: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या मराठे ज्वेलर्स पुरस्कृत 5व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत मिडजेट मुलींच्या गटात ऊर्जा निळे, मानांकीत खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला तर जश मोदी, क्रीश शेट्टी, अनिहा डिसुजा, साची दळवी, साक्षी देवकट्टे, सयान झवेरी, नील गोसावी यांनी आपापल्या गटात मानांकीत खेळाडूंवर मात करत आगेकुच केली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील बॉक्सिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत मिडजेट मुलींच्या गटात उपउपांत्यपुर्व फेरीत धुळ्याच्या ऊर्जा निळेने पुण्याच्या चौथ्या मानांकीत जान्हवी फणसेचा 6/11, 6/11, 11/5, 11/9, 13/11 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला तर पुण्याच्या अव्वल मानांकीत देवयानी कुलकर्णीने पुण्याच्याच बिग मानांकीत निधि भांडारकरचा 11/6, 11/7, 11/4 असा पराभव करत आगेकुच केली.
मिडजेट(10 वर्षाखालील) मुलांच्या गटात दुस-या फेरीत ठाण्याच्या अव्वल मानांकीत हृदय जैनने रायगडच्या सिध्दार्थ गबालाचा 11/4, /11/8, 11/8 असा तर मुंबई उपनगरच्या दुस-या मानांकीत देव हिंगोरणयने पुण्याच्या रेयान डिसुझाचा 11/7, 11/6, 11/9 असा पराभव करत आगेकुच केली.
सबजुनियर (15 वर्षाखालील) मुलांच्या गटात दुस-या फेरीत मुंबई शहरच्या धृव दासने पुण्याच्या नील मुळेचा 11/4, 11/4, 11/8 असा पराभव केला. मुंबई उपनगरच्या बिगर मानांकीत जश मोदीने मुंबई उपनगरच्याच दहाव्या मानांकीत हवीश असराणीचा 13/11, 12/10, 4/11, 11/3 असा पराभव केला तर मुंबई उपनगरच्या बिगर मानांकीत क्रीश शेट्टीने ठाण्याच्या पंधराव्या मानांकीत कौशल देशवंडीकरचा 11/6, 11/9, 10/12, 11/8 असा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली.
सबजुनियर (15 वर्षाखालील) मुलींच्या गटात दुस-या फेरीत अव्वल मानांकीत मुंबई उपनगरच्या विधी शहाने पुण्याच्या प्रिती साळुंखेचा 11/5, 11/8, 11/4 असा पराभव केला. पुण्याच्या बिगर मानांकीत अनिहा डिसुजाने ठाण्याच्या आठव्या मानांकीत अर्पीता जोशीचा 9/11, 13/11, 11/7, 11/4 असा पराभव केला. ठाण्याच्या बिगर मानांकीत साची दळवीने मुंबई उपनगरच्या चौथ्या मानांकीत शिफा शेखचा 10/12, 11/6, 11/7, 6/11, 12/10 असा तर परभणीच्या बिगर मानांकीत साक्षी देवकट्टेने मुंबई उपनगरच्या पंधराव्या मानांकीत अनन्या चांदेचा 11/9, 11/4, 10/12, 7/11, 11/6 असा पराभव करत आगेकुच केली.
कॅडेट(12 वर्षाखालील) मुलांच्या गटात दुस-या फेरीत पुण्याच्या सहाव्या मानंकीत नील मुळेने कोल्हापुरच्या आदर्श पाटीलचा 11/1, 11/2, 11/5 असा पराभव करत आगेकुच केली. मुंबई उपनगरच्या अव्वल मानांकीत ठाण्याच्या आशय यादवचा 11/8, 11/2, 11/5 असा पराभव केला. मुंबई शहरच्या बिगर मानांकीत सयान झवेरीने ठाण्याच्या बाराव्या मानांकीत अभिषेक दांडेकरचा 9/11, 7/11, 11/5, 13/11, 11/4 असा तर ठाण्याच्या बिगर मानांकीत नील गोसावीने ठाण्याच्याच तेराव्या मानांकीत हृदय जैनचा 11/9, 11/3, 11/7 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- मिडजेट(10 वर्षाखालील) मुली- उपउपांत्यपुर्व फेरी
ऊर्जा निळे(धुळे) वि.वि जान्हवी फणसे(पुणे, 6) 6/11, 6/11, 11/5, 11/9, 13/11
देवयानी कुलकर्णी(पुणे, 1) वि.वि निधि भांडारकर(पुणे) 11/6, 11/7, 11/4
जेनिफर व्हर्गीस(नागपुर,2) वि.वि काव्या भट(रायगड) 11/4, 11/6, 11/1
रिया कोठारी(अकोला, 3) वि.वि मृण्मयी साळवे(धुळे) 11/4, 13/11, 11/4
उर्वी चुरी(मुंबई उपनगर, 4) वि.वि अनन्या फडके(नाशिक) 11/7, 11/8, 11/3
वेदा राजे(नांदेड,5) वि.वि अनुष्का रावत(सोलापुर) 11/7, 11/2, 11/5
मिडजेट(10 वर्षाखालील) मुले- दुसरी फेरी
हृदय जैन(ठाणे, 1) वि.वि सिध्दार्थ गबाला(रायगड) 11/4, /11/8, 11/8,
देव हिंगोरणय(मुंबई उपनगर,2) वि.वि रेयान डिसुझा(पुणे) 11/7, 11/6, 11/9
प्रणव घोळकर(पुणे) वि.वि धृव शहा(मुंबई उपनगर) 12/10, 11/4, 11/5
कौस्तूभ गिरगावकर(नांदेड,9) वि.वि सिध्दार्थ बोहरा(पुणे) 13/11, 11/9, 13/11
स्वरूप भाडळकर(पुणे, 8) वि.वि मिहिर सिंग(धुळे) 13/11, 11/6, 8/11, 11/9
धृवील पाटील(धुळे,5) वि.वि आर्चीत पारगावकर(पुणे) 11/8, 11/2, 11/3
निलभ जाधव(परभणी) वि.वि वेदांत पाटील(कोल्हापुर) 6/11, 13/15, 11/8, 11/8, 11/8
दर्श भिडे(पुणे) वि.वि साहिल खारकर(ठाणे) 11/6, 6/11, 12/10, 11/7
पार्थ देशपांडे(पुणे, 6) वि.वि अनिकेत महाजन(धुळे) 11/1, 12/10, 11/3
सबजुनियर (15 वर्षाखालील) मुले- दुसरी फेरी
दिपीत पाटील(ठाणे, 1) वि.वि सम्यक मोटलींग(पुणे) 11/3, 11/3,11/2
धृव दास(मुंबई शहर) वि.वि नील मुळे(पुणे) 11/4, 11/4, 11/8
धृव झवेरी(मुंबई शहर, 9) वि.वि अक्षय पाटणकर(पुणे) 11/6, 6/11, 8/11, 11/5, 11/6
करण कुकरेजा(पुणे, 5) वि.वि राज कोठारी(अकोला) 11/5, 11/8, 11/7
जश मोदी(मुंबई उपनगर) वि.वि हवीश असराणी(मुंबई उपनगर, 10) 13/11, 12/10, 4/11, 11/3
क्रीश शेट्टी(मुंबई उपनगर) वि.वि कौशल देशवंडीकर(ठाणे, 15) 11/6, 11/9, 10/12, 11/8
सबजुनियर (15 वर्षाखालील) मुली- दुसरी फेरी
विधी शहा(मुंबई उपनगर,1) वि.वि प्रिती साळुंखे(पुणे) 11/5, 11/8, 11/4
अनिहा डिसुजा(पुणे) वि.वि अर्पीता जोशी(ठाणे,8) 9/11, 13/11, 11/7, 11/4
साची दळवी(ठाणे) वि.वि शिफा शेख(मुंबई उपनगर,4)10/12, 11/6, 11/7, 6/11, 12/10
साक्षी देवकट्टे(परभणी) वि.वि अनन्या चांदे(मुंबई उपनगर, 15) 11/9, 11/4, 10/12, 7/11, 11/6
कॅडेट(12 वर्षाखालील) मुले- दुसरी फेरी
हवीश असराणी(मुंबई उपनगर, 1) वि.वि आशय यादव(ठाणे) 11/8, 11/2, 11/5
सयान झवेरी(मुंबई शहर) वि.वि अभिषेक दांडेकर(ठाणे, 12) 9/11, 7/11, 11/5, 13/11, 11/4
नील गोसावी(ठाणे) वि.वि हृदय जैन(ठाणे, 13) 11/9, 11/3, 11/7
नील मुळे(पुणे,6) वि.वि आदर्श पाटील(कोल्हापुर) 11/1, 11/2, 11/5

