पुणे,– आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत
पुना क्लब क्रिकेट मैदान व पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत स्वप्निल आवळेच्या नाबाद 62 धावांच्या बळावर सेल2वर्ल्ड संघाने आयबीएम संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना आयबीएम संघाने 20 षटकात 9 बाद 148 धावा केल्या. यात पियुष कानिटकरने 30 व संकल्प देकाटेने 34 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 148 धावांचे लक्ष सेल2वर्ल्ड संघाने दोन षटके बाकी असताना 5 बाद 152 धावांसह पुर्ण करत उपउपांत्यपुर्व फेरी गाठली. स्वप्निल आवळे सामनावीर ठरला.
दुस-या लढतीत अंकित रावच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर यार्डी संघाने ऑल स्टेटस् संघाचा 81 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अमित राडकरच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर यार्डी संघाने 20 षटकात 9 बाद 177 धावा केल्या. 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑल स्टेटस् संघ 20 षटकात 9 बाद 96 धावांत गारद झाला. प्रमोद दवंडेने 3 तर अंकित रावने 4 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. अंकित राव सामनावीर ठरला.
तिस-या लढतीत गौरव सिंगच्या नाबाद 40 धावांच्या जोरावर टीसीएस संघाने कॅपजेमिनी संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना दिपक कुमारच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर कॅपजेमिनी संघाने 20 षटकात 6 बाद 133 धावा केल्या. 133 धावांचे लक्ष टीसीएस संघाने 3 चेंडू बाकी असताना 5 बाद 138 धावांसह पुर्ण करत विजय संपादन केला. गौरव सिंग सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
आयबीएम- 20 षटकात 9 बाद 148 धावा(पियुष कानिटकर 30, संकल्प देकाटे 34, मोहित श्रीवास्तव नाबाद 20, रोहन लुनावत 3-15, रोशन धोंगडे 3-26) पराभूत वि सेल2वर्ल्ड – 18 षटकात 5 बाद 152 धावा(स्वप्निल आवळे नाबाद 62, रोशन धोंगडे 22, कृष्णा राजपुत नाबाद 21, विजय कुमार 2-15) सामनावीर- स्वप्निल आवळे
सेल2वर्ल्ड संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.
यार्डी- 20 षटकात 9 बाद 177 धावा(अमित राडकर 50, पार्थ शहा 21, तरूण नोटानी 26, जीवन गोसावी 49, सुमित रावत 2-26, रवी गोहर 3-36) वि.वि ऑल स्टेटस्- 20 षटकात 9 बाद 96 धावा(जीत ठाकूर नाबाद 24, सुमित रावत 36, प्रमोद दवंडे 3-15, अंकित राव 4-11) सामनावीर- अंकित राव
यार्डी संघाने 81 धावांनी सामना जिंकला.
कॅपजेमिनी- 20 षटकात 6 बाद 133 धावा(हर्षल लुनागेरीया 30, दिपक कुमार नाबाद 54, वैभव जैन नाबाद 21, राहूल गर्ग 2-15) पराभूत वि टीसीएस-19.3 षटकात 5 बाद 138 धावा(कन्वरजीत सिंग 22, रोहित पाठक 25, गौरव सिंग नाबाद 40, चंद्रमैली रेड्डी 2-36) सामनावीर- गौरव सिंग
टीसीएस संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.