पुणे– प्रविण मसालेवाले प्रायो
बिबवेवाडी येथील हिलसाईड जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकीत मानस धामणेने चौथ्या मानांकीत अंशूल सातवचा 6-1, 6-1 असा तर दुस-या मानांकीत जैष्णव शिंदेने तिस-या मानांकीत राघव हर्षचा 6-3, 7-5, 6-1 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात अव्वल मानांकीत ईरा शहाने सहाव्या मानांकीत कश्मिरा सुंबरेचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला तर दुस-या मानांकीत रुमा गायकैवारीने बिगर मानांकीत रिया मथारूचा 6-4, 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
मानस धामणे(1) वि.वि अंशूल सातव(4) 6-1, 6-1
जैष्णव शिंदे(2) वि.वि राघव हर्ष(3) 3-6, 7-5, 6-1
उपांत्य फेरी: मुली:
ईरा शहा(1) वि.वि कश्मिरा सुंबरे(6) 6-0, 6-0
रुमा गायकैवारी(2) वि.वि रिया मथारू 6-4, 6-2