पाचगणी–
रवाईन हॉटेल, पाचगणी येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकीत क्रिशन हुडाने चौथ्या मानांकीत अर्णव पतंगेचा 6-1, 7-6(7) असा टायब्रेकमध्ये तर दहाव्या मानांकीत मोहित बोंद्रेने आठव्या मानांकीत आर्यन भाटियाचा 3-6, 7-6(3), 6-4 असा संघर्षपुर्ण लढतीत टायब्रेकमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात सोळाव्या मानांकीत ऋतुजा चाफळकरने अव्वल मनांकीत प्रेरणा विचारेचा 2-6, 6-2, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली व अंतिम फेरी गाठवी. तिस-या मानांकीत गार्गी पवारने बिगर मानांकीत वैष्णवी आडकरचा 6-1, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात क्रिशन हुडा व भुपेंद्र दहिया या जोडीने धन्या शहा व अर्जून कुंडू यांचा 7-5, 6-4 असा तर दुस-या मानांकीत नरेश बडगुजर व वंश भागटानी यांनी अर्णव पतंगे व यशराज दळवी यांचा 6-3, 7-5 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात प्रेरणा विचारे व ह्रदया शहा यांनी संजना सिरीमुल्ला व राई वाशिमकर यांचा 7-6(4), 1-6, 10-5 असा संघर्षपुर्ण लढतीत टायब्रेकमध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. ऋतुजा चाफळकरने आपली विजयी घोडदौड कायम राखत दुहेरीतही सानिया मसंदच्या साथीत रेनी सिंगला व रेनी सिंग यांचा 6-3, 6-2 असा सहज पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : मुले:उपांत्य फेरी:
क्रिशन हुडा(1)वि.वि. अर्णव पतंगे(4) 6-1, 7-6(7);
मोहित बोंद्रे(10) वि.वि आर्यन भाटिया(8) 3-6, 7-6(3), 6-4;
मुली- ऋतुजा चाफळकर(१६)वि.वि प्रेरणा विचारे(1) 2-6, 6-2, 6-2;
गार्गी पवार(3) वि.वि वैष्णवी आडकर 6-1, 6-3;
दुहेरी गट- मुले- उपांत्य फेरी:
क्रिशन हुडा/भुपेंद्र दहिया वि.वि धन्या शहा/अर्जून कुंडू 7-5, 6-4;
नरेश बडगुजर/वंश भागटानी(2) वि.वि अर्णव अर्णव पतंगे /यशराज दळवी 6-3, 7-5;
मुली- प्रेरणा विचारे/ह्रदया शहा(1) वि.वि संजना सिरीमुल्ला/ राई वाशिमकर (3) 7-6(4), 1-6, 10-5;
ऋतुजा चाफळकर/सानिया मसंद(4) वि.वि रेनी सिंगला/रेनी सिंग 6-3, 6-2.