पुणे– पीवा
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत गोल्डन बॉयज् संघाने एमराल्ड संघावर 18-1 असा एकतर्फी विजय मिळवला. संतोष जयभाय , प्रशांत गोसावी, डॉ.चारू साठे, सुनिता रावळ, मुकुंद जोशी, अमित पाटणकर आदित्य खतोड व सुरेश घुले यांच्या दमदार कामगिरीच्या बळावर गोल्डन बॉयज् संघाने सर्व टाय जिंकत एमराल्ड संघाचा पराभव केला.
दुस-या लढतीत एमडब्ल्यूटीए संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 18 – 6 असा सहज पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. विजयी संघाकडून राजेश मानकोनी, सुनिल लुल्ला,प्रविण पांचाल, निलेश ओसवाल, अशिष मनियार व एस.अभिषेक यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
अन्य लढतीत पीसीएमसी संघाने बेसलाईन बॅंबर्स संघाचा 15 – 14 असा संघर्षपुर्ण लढतीत पराभव केला. तर टोपाझ संघाने महाराष्ट्र मंडळ संघाचा 17 – 8 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
गोल्डन बॉयज् वि.वि एमराल्ड 18-1(टाय १: ८०अधिक गट: संतोष जयभाय/प्रशांत गोसावी वि.वि डॉ.चारू साठे/सुनिता रावळ 6-0; टाय 2ः मुकुंद जोशी/अमित पाटणकर वि.वि रवी रावळ/ पराग टेपन 6 – 0; टाय 3ः आदित्य खतोड/सुरेश घुले वि.वि सौरभ चिंचणकर/ कौशिक कृष्णन 6-1)
एमडब्ल्यूटीए वि.वि डेक्कन जिमखाना 18 – 6(टाय १: ८०अधिक गट: राजेश मानकोनी/सुनिल लुल्ला वि.वि योगेश नातू/संजय पाटील 6 – 1; टाय 2ः प्रविण पांचाल/निलेश ओसवाल वि.वि पंकज यादव/पुष्कर पेशवे 6 – 3; टाय 3ः अशिष मनियार/ एस.अभिषेक वि.वि नितिन खैरे/श्रीनिवास रामदुर्ग 6-2)
पीसीएमसी वि.वि बेसलाईन बॅंबर्स 15 – 14(टाय १: ८०अधिक गट: प्रविण घोडे/कुरियन थांचाकन पराभूत वि निर्मल वाधवानी/उमेश माने 4 – 6; टाय 2ः राजेश मित्तल/कल्पेश मकानी वि.वि मनु एन/समिर भांबरे 6 – 2; टाय 3ः रवी जौकनी/गिरिश कुलकर्णी पराभूत वि अनंत गुप्ता/गौतम सोपान 5 – 6 (6-8))
टोपाझ वि.वि महाराष्ट्र मंडळ 17 – 8(टाय १: ८०अधिक गट: योगेश पंतसचिव/डॉ.जेम्स वि.वि अर्पित श्रॉफ/कमलेश शहा 6 – 1; टाय 2ः अमित नाटेकर/सारंग देवी वि.वि संजय शेट्टी/रवी अज्जामपुडी 6 – 1; टाय 3ः अमित लाटे/राजू कांगो पराभूत वि अभिषेक चौहान/ विक्रम श्रीश्रीमल 5 – 6 (5-7))