औषध व पथ्याशिवाय व्याधींचे समूळ उच्चाटन करण्याची क्षमता
पुणे : हातावर व पायावर आजारानुसार विशिष्ट पद्धतीने उपचार करून केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आजारही दूर लोटण्याची क्षमता असणारी सुजोक उपचार पद्धती आता पुण्यातही विकसित झाली आहे. ही अत्यंत प्रभावी पद्धती असून यानुसार उपचार घेताना कोणत्याही प्रकारची औषधे व पथ्य रुग्णांना दिले जात नाही. अत्यंत कमी वेळेत व कमी खर्चात आजाराचे समूळ उच्चाटन करण्याची ताकद सुजोगमध्ये असल्याने अनेक पुणेकरांच्या पसंतीस ही उपचार पद्धती उतरत असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय सुजोग असोसिएशनच्या(आयएसए) माध्यमातून या उपचार पद्धतीत प्राविण्य प्राप्त केलेले पुण्यातील श्री संजय किंकर यांनी केला आहे .
ते म्हणाले ,’प्रथमत: कोरियामध्ये प्राध्यापक पार्क यांनी विकसित केलेली ही प्रणाली भारतात मद्रास व जयपूर येथे सुरु झाली. सु म्हणजे हात आणि जोक म्हणजे पाय. या उपचार प्रणालीमध्ये हातावर व पायावर उपचार करून आरोग्य प्राप्त करून रोगावर प्रतिबंध करता येतो. हातावर व पायावर केलेला उपचार हा शरीरातल्या दुखणाऱ्या भागावर काम करतो व दुखणे त्वरित बरे होते. मुख्यत: ही पद्धती थेअरी ऑफ रीझोनन्स(समानता) यांवर आधारित आहे. ही पद्धती अत्यंत सोपी व प्रभावी आहे. या उपचार पद्धतीतून शारिरीक व मानसिक आजार बरे होऊन त्यावर नियंत्रण आणता येते. ही उपचार पद्धती सर्वांगीण असून यात विशिष्ट पद्धतीचा व्यायाम अंतर्भूत आहे.
त्यांनी असेही सांगितले की, सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना मणक्यांचे सर्व आजार, मधुमेह, उच्च रक्तादाब, पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, मुळव्याध, मुतखडा आदी प्रकारांच्या आजारांना सामोरे जावे लागते. अशा अनेक आजारांवर सुजोग उपचार पद्धती अत्यंत प्रभावीपणे कार्य करते. या उपचार पद्धतीत रंग, लघू लोहचुंबक, धांन्याच्या बिया तसेच एक्युपंचरचा प्रामुख्याने वापर होतो. प्राणशक्तीचे शरीरातील संतुलन करून आरोग्य प्राप्त करून देण्याचे कार्य यात होते. ही उपचार पद्धती जगातील ६८ देशात वापरली जाते. विज्ञान शाखेतून १२ वी उतीर्ण झालेला विद्यार्थी ही उपचार पद्धती अवगत करण्यासाठी पात्र असून गुजरात सौराष्ट विद्यापीठामध्ये या उपचार पद्धतीचे पदविका अभ्यासाक्रम घेतले जातात. सुजोगच्या प्रसार आणि प्रचारासाठी आयएसएमार्फत मोबाईल एप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. गुगल स्टोरवर मोफत डाउनलोड स्वरूपात ते सर्वांसाठी उपलब्ध असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.