पुणे : शहरातील वाढते वायू प्रदूषण कमी करण्यासह, शहरात ई- वाहनांना चालना देण्यासाठी महापालिकेकडून शहरात ई -बाईक भाडेतत्वावर देणे तसेच या बाईक पुरविणाऱ्या दोन कंपन्यांना या बाईक च्या चार्जिंगसाठी शहरात 500 ठिकाणी रस्त्याच्या कडेला जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मंगळवारी महापालीच्या मुख्य सभेत सभेमध्ये मंजूर करण्यात आला. तत्कालीन शहर सुधारणा समितीमध्ये अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी पुढाकार घेत मंजूर केला होता. त्यानंतर, हा विषय जवळपास वर्षभरापासून मुख्यसभेच्या मान्यतेसाठी पडून होता.
महापालिकेने विट्रो मोटर्स प्रा. लि. आणि ई- मॅट्रीक्स माईल या कंपन्यांना हे काम देण्यात आले आहे शहरात विट्रो मोटर्स प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून भाडेतत्वावर ई बाईक पुरविणे तसेच या कंपनीला शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशनसाठी व बाईक पार्किंगसाठी रस्त्याच्या कडेला जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जून 2020 मध्ये यानंतर जुलै 2020 मध्येच स्थायी समितीने प्रशासनाकडून अभिप्राय घेतल्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करून सर्वसाधारण सभेकडे पाठविला होता. डिसेंबर 2020 च्या कार्यपत्रिकेवर असलेल्या या प्रस्तावामध्ये महापालिकेकडे ई बाईक्स पुरविण्याची तयारी दर्शविलेल्या ईमॅट्रीक्स माईल या कंपनीचाही समावेश केला. आज या प्रस्तावाला मुख्यसभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. दरम्यान, या प्रकल्पामुळे शहरात सर्वसामान्यांना स्वस्त दरात ई -बाईक्स प्रवासासाठी उपलब्ध होणार असून खासगी वाहनांच्या वापर कमी होऊन वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
पुण्यात भाडेतत्वावर ई -बाईक्स-नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या प्रयत्नांना यश
Date:

