पुणे- भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी चे टेक्नोलॉजी अनेब्लिंग सेंटर व नीती विद्यापीठ मंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नॅशनल लेवल आयडीएशन ड्राईव्ह इन हेल्थ अँड अलाईड सायन्सेस २०२१ स्पर्धेमध्ये अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती पुणे महाविद्यालयाच्या एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक पटकाविले. शुभम मोहिते व त्याच्या टीमने या राष्ट्रीय पातळीवरील आयडीएशन ड्राईव्ह इन हेल्थ अँड अलाईड सायन्सेस २०२१ स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून प्रथम पारितोषिक पटकाविले.डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी चे टेक्नोलॉजी अनेब्लिंग सेंटर तर्फे नुकतीच हि स्पर्धा घेण्यात आली. आयडीएशन ड्राईव्ह इन हेल्थ अँड अलाईड सायन्सेस २०२१ हि या स्पर्धेची संकल्पना होती. या स्पर्धेमध्ये वॉटर अँड सॅनिटेशन, सॉलिड वेस्ट अँड बायो वेस्ट मॅनेजमेंट या संकल्पनेवर सादरीकरण केले. या स्पर्धेमध्ये पात्रता फेरी, उपांत्यपूर्व फेरी व अंतिम फेरी अश्या विविध टप्प्यातून अंतिम फेरीमध्ये अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती पुणे महाविद्यालयाच्या एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग विभागातील शुभम व त्याच्या टीमने प्रथम पारितोषिक पटकाविले. या विद्यार्थ्यांनी प्रा. सागर गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाचे सादरीकरण केले या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल संस्थेच्या सरचिटणीस मा.सौ. प्रमिला गायकवाड व डॉ .एन.बी.पासलकर सदस्य, महाविद्यालय विकास समिती, डॉ. प्रभाकर देशमुख देशमुख माजी सनदी अधिकारी,संयुक्त चिटणीस अँड भगवानराव साळुंखे,खजिनदार श्री. विजयसिंह जेधे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे , सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
अनंतराव पवार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश
Date:

