जिद्द, आत्मविश्वास व परिश्रमाने उद्योगात यश-प्रतापराव पवार

Date:

विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये उद्योजकता विकास मार्गदर्शन
पुणे : “नोकरी तुमची गरज पूर्ण करते, तर उद्योग तुमची स्वप्न पूर्ण करतात. त्यामुळे उद्योग-व्यवसाय करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. उद्योगात भांडवल यापेक्षाही मानसिकता महत्वाची आहे. आपल्या मनातील आग, जिद्द, आत्मविश्वास, त्याला मिळालेली कठोर परिश्रम आणि बाजारपेठेची जाण यामुळे यशस्वी उद्योजक होता येते,” असा कानमंत्र ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांनी दिला.
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या विद्यार्थी विकास केंद्रांतर्गत आपटे वसतिगृहात आयोजित उद्योजकता विकास मार्गदर्शन सत्रात पवार बोलत होते. प्रसंगी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त सुप्रिया केळवकर, तुषार रंजनकर, ज्योती गोगटे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे अधिकारी सुरेश उमाप आदी उपस्थित होते. प्रसंगी समितीतील विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या स्टार्टअपचे सादरीकरण करण्यात आले.
प्रतापराव पवार म्हणाले, “आजवर मोठे होऊन चांगली नोकरी करावी, अशीच शिकवण दिली जाते. मात्र, हे बदलून लहापणापासूनच उद्योगाचा संस्कार दिला पाहिजे. त्यातून येणारी पिढी उद्योगाची कास धरेल. आपल्या व्यवसायाची सखोल माहिती व लोकांची गरज याची सांगड घालता आली पाहिजे. आज अनेक पर्याय, तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून आपण उद्योग सुरु करावेत. अपयशातून शिकत जावे. जिद्द सोडू नये. उद्योजकासह चांगला व्यक्ती बनण्यावर लक्ष द्या. “
यावेळी पवार यांनी अनेक यशस्वी उद्योजकांची यशोगाथा सांगितली. महाराष्ट्रात लाखो उद्योग आहेत; परंतु उद्योगात मराठी माणूस नाही, हे खेदजनक चित्र आहे. हे चित्र बदलण्यासाठी उद्योजकता विकास केंद्र सुरु करीत आहोत. यातून मुलामुलींची नोकरीची मानसिकता बदलेल, असे सुरेश उमाप यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उद्योजकता आणि सरकारी योजना याविषयी माहिती दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

​आयकर स्लॅब ‘जैसे थे’! नोकरदारांच्या अपेक्षांवर पाणी

कॅन्सरच्या 17 औषधांवर कस्टम ड्यूटी नाही, 3 आयुर्वेदिक एम्स,...

खासगी ऑनलाईन बैठकीचे बेकायदा रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या साहित्य...

बोपोडी येथे अजित पवार यांना श्रद्धांजलीसाठी सर्वपक्षीय शोकसभा, भावनिक वातावरणात नागरिकांची मोठी उपस्थिती

ॲड. निलेश निकम यांच्या भावुक अनुभवाने उपस्थितांचे डोळे पाणावले पुणे- बोपोडी...