Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

ऑस्ट्रेलियन शिक्षणाला पुण्यात प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्टडी ऑस्ट्रेलिया’ रोड शो

Date:

ऑस्ट्रेलियाच्या सरकारचा उपक्रम पुण्यात जागतिक दर्जाच्या शिक्षणाद्वारे जागतिक करिअर घडविण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून भारतीय विद्यार्थ्यांना सहाय्य-भविष्यातील विद्यार्थ्यांना व्हिसाचे विविध आकर्षक पर्याय आणि अभ्यासानंतरचे कामाचे अधिकार देऊन मदत करण्यास कटिबद्ध.

पुणे३० मार्च २०२२ : जागतिक दर्जाचे शिक्षण, अभ्यासानंतरच्या कामाच्या संधी आणि राहणीमानाची गुणवत्ता यांकरीता अनेक भारतीय विद्यार्थी गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेण्याचा पर्याय निवडत आहेत. या अनुषंगाने, पुणे विभागातील विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियामध्ये शिकण्यासाठी आकर्षित करून घेण्यासाठी, ऑस्ट्रेलियन व्यापार व गुंतवणूक आयोगाने पुणे शहरात आज एक ‘रोड शो’ आयोजित केला. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारने सुरू केलेल्या विविध उपक्रमांवर या रोड शोमध्ये भर देण्यात आला.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आणि पदवीधरांना ऑस्ट्रेलियन सरकारतर्फे नवीन व्हिसासंबंधी सहाय्य पुरविण्यात येत आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व्हिसा शुल्क परतावा व कोविड-१९ व्हिसा शुल्क माफी, इंग्रजी भाषेच्या चाचण्या व आरोग्य तपासणीसाठी अतिरिक्त वेळ, तात्पुरता पदवीधर व्हिसा बदलणे आणि ‘मुक्काम आणि काम’ या योजनेचा विस्तारित कालावधी, या सुविधांचा समावेश आहे. याशिवाय, १९ जानेवारी ते १९ मार्च २०२२ या दरम्यान ऑस्ट्रेलियात आलेल्या व पूर्ण लसीकरण झालेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व्हिसाधारकांना व्हिसाच्या अर्जाच्या शुल्क परताव्यासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. सध्याच्या व्हिसाधारकांना आणि नवीन विद्यार्थ्यांना हा परतावा मिळू शकेल. यासाठी पात्र ठरलेले व्हिसाधारक ३१ डिसेंबर २०२२पर्यंत कधीही दावा करू शकतील.

एक फेब्रुवारी २०२० रोजी किंवा त्यानंतर विद्यार्थी व्हिसा घेतलेले आणि कोविड-१९च्या साथीमुळे आपल्या मूळ व्हिसा कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करू न शकलेले सध्या ऑस्ट्रेलियात राहणारे विद्यार्थी हे व्हिसा अर्ज शुल्क (व्हीएसी) माफ करून घेण्यास पात्र ठरतील. विद्यार्थी व्हिसासाठी नव्याने अर्ज करताना त्यांना ही सवलत मिळेल.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व्हिसाधारकांसाठी कामाच्या निर्बंधांमध्ये तात्पुरती शिथिलता, याचा अर्थ, ऑस्ट्रेलियामध्ये शिकत असताना विद्यार्थी किती तास काम करू शकतात, यावर सध्या कोणतेही निर्बंध नाहीत. या बदलांचे एप्रिल २०२२मध्ये पुनरावलोकन केले जाईल. अर्थात याकरीता विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाची समाधानकारक नावनोंदणी, वर्गातील उपस्थिती आणि अभ्यासातील प्रगती यांचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

वैध तात्पुरता ग्रॅज्युएट व्हिसा (उपवर्ग ४८५) धारण केलेले जे पदवीधर १ फेब्रुवारी २०२० ते १४ डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑस्ट्रेलियाच्या बाहेर गेले आणि त्यानंतर कोविड-१९ मुळे लागू झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रवास निर्बंधांमुळे ज्यांना ऑस्ट्रेलियात येता आले नाही, त्यांच्या व्हिसाची मुदत ३० सप्टेंबर २०२२पर्यंत वाढविण्यात येणार आहे. पात्र पदवीधरांना बदली व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी ही मुदत देण्यात आली आहे.

‘मास्टर्स बाय कोर्सवर्क’ पदवीधरांमधील तात्पुरत्या पदवीधर व्हिसाधारकांच्या (उपवर्ग ४८५) मुक्कामाची मुदत दोन (२) वरून तीन (३) वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ‘मास्टर्स बाय रिसर्च’ पदवीधरांसाठीच्या विद्यमान तरतुदींशी जुळणारी ही सवलत आहे. व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण (व्हीईटी) क्षेत्रातील पदवीधरांनादेखील दोन (२) वर्षांचा तात्पुरता पदवीधर व्हिसा मिळेल.

या उपक्रमांबद्दल बोलताना ऑस्ट्रेलियाच्या सरकारच्या ऑस्ट्रेलियन व्यापार व गुंतवणूक आयोगाच्या वरिष्ठ व्यापार व गुंतवणूक आयुक्त डॉ. मोनिका केनेडी म्हणाल्या, “२२ नोव्हेंबर २०२१ (जेव्हा ऑस्ट्रेलियन सरकारने विद्यार्थ्यांसाठी सीमा उघडण्याची घोषणा केली) ते १८ मार्च २०२२ या काळात भारतीय नागरिकांनी २८,७८५ विद्यार्थी व्हिसा दाखल केले आहेत. २०२२मधील पहिल्या सेमिस्टरचा अभ्यास सुरू करण्यासाठी भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियात परत येऊ शकतील याची खातरजमा करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारने विद्यार्थी व्हिसावर प्रक्रिया करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. या संदर्भात अनेक अर्ज दाखल करण्यात आले होते. २२ नोव्हेंबर २०२१ ते १८ मार्च २०२२ या कालावधीत त्यांतील १५,३१० अर्जांवर प्रक्रिया यशस्वी होऊन हे व्हिसा मंजूर झाले आहेत. तसेच, ऑस्ट्रेलियाच्या उत्कृष्ट शिक्षण संस्थांमध्ये दाखल होण्यासाठी किंवा आपला अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यासाठी २५ हजारांहून अधिक विद्यार्थी आमच्या देशात येत आहेत.

उच्च गुणवत्ता, अधिमान्यतेचे कठोर निकष, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक मदत प्रणाली, प्रासंगिक अभ्यासक्रम आणि पदवीधरांसाठी रोजगाराभिमुखतेचा उत्तम दर या वैशिष्ट्यांमुळे ऑस्ट्रेलियातील शिक्षणावर गुंतवणूक केल्यास विद्यार्थ्यांना चांगला परतावा मिळतो. त्यामुळेच ऑस्ट्रेलियन शिक्षणाला जागतिक स्तरावर सर्वाधिक मागणी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षणाठीची जगातील सर्वात जास्त सहाय्यक स्वरुपाची प्रणाली आहे. विद्यार्थ्यांचे अनुभव, विद्यार्थी संरक्षण आणि विद्यार्थ्यांचे हक्क या बाबींना ‘ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजी फॉर इंटरनॅशनल एज्युकेशन २०२१-२०३०’तर्फे सर्वात जास्त महत्त्व देण्यात येते.”

कोविड-१९ साथीच्या अभूतपूर्व उद्रेकाने जगभरातील लाखो विद्यार्थ्यांचे, विशेषत: आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे जीवन विस्कळीत झाले. आरोग्यविषयक जोखीम व इतर देशांमध्ये जाण्यावर निर्बंध यांमुळे त्यांच्यापुढे अडथळे उभे राहिले. या पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियन विद्यापीठांमध्ये सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची रोजगारक्षमता कौशल्ये वाढवणारा ‘स्टडी ऑस्ट्रेलिया इंडस्ट्री इमर्सन प्रोग्राम’ (एसएआयईपी) ऑस्ट्रेलियन व्यापार व गुंतवणूक आयोगाने नुकताच सुरू केला आहे.

भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध सध्या सर्वकालीन उच्च पातळीवर आहेत. २०२०मध्ये आमची सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी मान्य झाल्यापासून आमच्या सहकार्याची गती आणि त्याचे प्रमाण यांत झपाट्याने वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात २१ मार्च रोजी नुकत्याच झालेल्या शिखर परिषदेमध्ये हे परस्पर सहकार्य वाढविण्याकरीता प्रयत्न करण्याचे, महत्त्वाकांक्षा नवीन स्तरांवर नेण्याचे आवाहन करण्यात आले. विशेषत: आर्थिक सहकार्य आणि मोठी क्षमता असलेले शिक्षण क्षेत्र यांचा यामध्ये विचार करण्यावर परिषदेत भर देण्यात आला.

या शिखर परिषदेत पंतप्रधानांनी शैक्षणिक पात्रता ओळख या विषयावर कृती दल निर्माण करण्याची घोषणा केली. हे दल ऑनलाइन आणि मिश्रित शिक्षण, संयुक्त पदवी आणि ऑफशोअर कॅम्पसमध्ये शिक्षण अशा विविध प्रकारच्या शैक्षणिक पद्धतींचा विचार करील. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात शैक्षणिक पात्रता ओळख वाढवण्यासाठी हे कृती दल या वर्षाअखेरीस यंत्रणा उभी करील. ही यंत्रणा २०२३पासून अमलात येईल.

‘स्टडी ऑस्ट्रेलिया’ योजना आणि भारतीय विद्यार्थ्यांसाठीचे सहाय्य यांविषयीची अधिक माहिती https://www.studyaustralia.gov.au/india या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ऑस्ट्रेलियन व्यापार व गुंतवणूक आयोगाबद्दल –

‘द ऑस्ट्रेलियन ट्रेड अॅंड इन्व्हेस्टमेंट कमिशन’ (ऑस्ट्रेड) ही ऑस्ट्रेलियन सरकारची आंतरराष्ट्रीय व्यापार व गुंतवणूक यांना चालना देणारी एजन्सी आहे. ऑस्ट्रेलियामधील समृद्धी वाढवण्यासाठी आम्ही विविध व्यवसायांना व्यापार आणि गुंतवणुकीच्या दर्जेदार सेवा देतो. बाजारपेठेची सखोल माहिती मिळवणे व तिचे वितरण करणे, ऑस्ट्रेलियन क्षमतेचा प्रचार करणे आणि आमच्या विस्तृत जागतिक नेटवर्कद्वारे कनेक्शन्स मिळवून देणे ही कामे आम्ही करतो.

ऑस्ट्रेलियातील शिक्षण प्रदात्यांची जागतिक प्रासंगिकता, व्यावहारिकता आणि गुणवत्ता, तसेच त्यांच्यातील नावीन्यता, सर्जनशीलता आणि भवितव्य यांवर लक्ष केंद्रित करून आम्ही ऑस्ट्रेलियन शिक्षणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतो.

आम्ही तुम्हाला कशी मदत करू शकतो, हे शोधण्यासाठी, https://www.austrade.gov.au/ या पोर्टलला भेट द्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...

बांग्लादेशी राज्यात आणून सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्या जवळचे ड्रग्सचे कारखाने चालवत आहेत.

ड्रग्स कारखानाप्रकरणी पकडलेल्या ४३ पैकी ४० बंगाली व बांग्लादेशी...