पुणे- महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई व अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती पुणे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षमतेत अखंडपणे योगदान देणारे तंत्रज्ञ घडावेत या हेतूने ‘टेक्नोथॉन २०२२’ या दोन दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस सौ.प्रमिला गायकवाड , डॉ.विनोद मोहितकर संचालक महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, डॉ.रघुनाथ शेवगावकर माजी संचालक आय.आय.टी. दिल्ली, डॉ.संजय कोयंडे संचालक, सीसीआरटी मटेरीअल्स प्रा.ली., डॉ. एन.बि.पासलकर माजी संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्या उपस्थितीत झाले.या प्रसंगी बोलताना संशोधन आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात आमुलाग्र बदल घडत आहेत. रोज नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी सामाजिक समस्या सोडविण्यासाठी करावा असे अवाहन केले. विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना सत्यात उतरविण्यासाठी हे एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. रोबोटिक्स,ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सारख्या नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे असे मार्गदर्शन डॉ. एन.बि.पासलकर यांनी केले. समाजाचा शाश्वत विकास साधण्यासाठी तांत्रिक कौशल्यासोबतच नैतिक व सामाजिक मूल्ये आपण अंगिकारली पाहिजेत असे मार्गदर्शन डॉ.विनोद मोहितकर यांनी केले. डॉ.संजय कोयंडे यांनी समाजाचा शाश्वत विकास साधायचा असेल तर नव तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे असे मत मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील ठाकरे व स्पर्धेचे समन्वयक डॉ.अभय शेलार यांनी हि स्पर्धा घेण्याचा हेतू व महत्व पटवून सांगितले. यास्पर्धेमध्ये प्रकल्प स्पर्धा,पेपर प्रेझेटेशन, पोस्टर अशा तीन प्रकारामध्ये सबंध महाराष्ट्रातील ३०० तंत्रनिकेतन च्या २२०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रमासाठी संस्थेच्या सरचिटणीस मा.प्रमिला गायकवाड, डॉ.रघुनाथ शेवगावकर, डॉ.विनोद मोहितकर, डॉ.संजय कोयंडे व डॉ. एन.बि.पासलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे, स्पर्धेचे समन्वयक प्रा.अभय शेलार, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी उपस्थिती नोंदविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नेहा देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.स्नेहा साळवेकर यांनी केले.