पुणे- संभाजी ब्रिगेड कडून सोमैय्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे या संदर्भात संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे कि,’किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला निषेधार्ह आहे. सत्ताधारी असले म्हणून तुम्ही इतर नेत्यांवर हल्ले करणार असाल तर अशाने महानगरपालिकेवर सत्ता मिळणार नाही. सोमय्या यांनी सुद्धा राजकारण करू नये. मनपा निवडणुकीचे राजकारण पाहता पुण्यात कायदा-सुव्यवस्था उरलेली नाही, याचं दर्शन आज झाले. पक्ष कोणताही असो, सूडबुद्धीने राजकारण कोणीही करू नये. मात्र किरीट सोमय्या यांना ‘पायऱ्यावर घसरून माकड हाडापर्यंत मार लागणे म्हणजे त्यांच्या जिवाला धोका होणारी घटना आहे. चक्क पिटाळून लावले.’ या तालिबानी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो… मात्र शिवसेनेची सुद्धा भूमिका समजून घेतली पाहिजे.किरीट सोमय्या यांनी भाजपने पुणे महानगर पालिकेत केलेल्या भ्रष्टाचारावर सुद्धा बोललो पाहिजे. मात्र सूडबुद्धीने व सोयीने राजकारण करण्याच्या नादात ते खालच्या पातळीला जाऊन राजकारण करतात कदाचित त्याचीच शिवसेनेने किरीट सोमय्या यांना पोचपावती दिली असावी.स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असाच प्रकार दिसतो…! असेही संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.
संभाजी ब्रिगेड कडून सोमैय्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध
Date:

