अभिनेत्री कंगणा राणावतच्या विरोधात महिला काँग्रेसचं जोरदार आंदोलन.

Date:

पुणे,दि.१२. अभिनेत्री कंगणा राणावतने भारतीय स्वातंत्र्याविषयी केलेल्या संतापजनक विधानाविरोधात पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतिने आज राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस दिप्ती चवधरी,भूषण राणभरे,अजित जाधव, द.स. पोळेकर,रमेश अय्यर,राहुल सोनवणे, उपस्थित होते. यावेळी बोलताना महिला काँग्रेसच्या अध्यक्षा व प्रदेश सचिव सोनाली मारणे म्हणाल्या की, “एक विकृत बुद्धीची तीनपाट नटी अन्नदात्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणते, महाराष्ट्राची शान असणाऱया मुंबईला मिनी पाकिस्तान म्हणते आणि आता समस्त राष्ट्रीय नेते आणि भारतीयांनी प्रचंड संघर्ष करून, गोळ्या झेलून, तूरूंगवास भोगून, लाठ्या काठ्या घेऊन मिळविलेल्या स्वातंत्र्याला भिक म्हणते…. ही विकृती आली कुठून ? हिच्या मुखातून कोणाचे विचार बाहेर पडत आहेत ? याचा विचार करण्याची वेळ आता आलीय……

या विकृत बाईला परवाच आपल्या राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचं अवमूल्यन थांबलं पाहिजे. या पुरस्काराची प्रतिष्ठा जपण्यासाठी ताबडतोब तिचा पुरस्कार काढून घेणं गरजेचं आहे. केंद्र सरकारनं हे ऐवढं तरी करावं अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. मागे एकदा खा. प्रज्ञा ठाकूर या दुसऱ्या एका विकृत बाईने राष्ट्रपिता महात्माजी गांधींबद्दल असंच विधान केलं होतं. भाजपाच्या युवा आघाडीची एक वेडसर पोरगी असंच मागे स्वातंत्र मिळालं नसून करार झाला म्हणाली.गांधीजी, नेहरूजी, भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दल संघ परीवाराला एक असूया आहे, राग आहे. कारण ही राग असणारी मंडळी त्या वेळी इंग्रजांच्या बाजूची होती. इंग्रजांशी एकनिष्ठ राहण्याच्या यांनी शपथा घेतल्या होत्या. स्वातंत्र सैनिकांच्या गुप्त खबरा हे इंग्रजांना पूरवायचे, इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. म्हणून संघर्षातून मिळालेल्या स्वातंत्र्याची यांना चिड आहे. ती कंगणाकडून हेच लोक वदवून घेत असण्याची शक्यता आहे…. देशभक्तीचे नारे देऊन, भारतमातेच्या घोषणा देऊन, महापुरूषांचा वारसा आंम्ही चालवतो म्हणत, उठता बसता वंदे मातरम् म्हणणारे भाजपवाले आता या देशाच्या स्वातंत्र्याचा असा अपमान होताना कुठं लपून बसले आहेत ? मोदीजी का कांहीच बोलत नाहीत, अमित भाईंचं का कांही स्टेटमेंट नाही ? JNU, दिल्ली विद्यापीठ, जाधवपूर विद्यापीठ, हैद्राबाद विद्यापीठ, जामिया मिलीया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर खोटे आरोप करून देशद्रोहाचे खटले लादणारं केंद्र सरकार कंगणा नावाची विकृती ठेचणार आहे का ? कि बक्षीस म्हणून तिला भारतरत्न बहाल करणार आहात ?मोदीजी, आता तूम्हाला १५ आगस्ट, २६ जानेवारीला लाल किल्यावरून देशाला संबोधित करायचा नैतिक अधिकार अबाधीत ठेवाय चचा असेल तर कंगणाचा पद्मश्री काठून घ्या. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा असेही त्या म्हणाल्या .

यावेळी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी मीरा ताई शिंदे शर्वरी ताई गोतारणे, रझिया ताई बल्लारी, ज्योती ताई आरवेन,शारदा ताई वीर, राजश्री ताई आडसूळ,अर्चना जाधव, कांचन बालनायक,ललिता जगताप, लता घडसिंग, नलिनी दोरगे, योगिता सुराना, सुंदर ओव्हाळ, ताई कसबे,नंदा ढावरे,गिता तारू,रोहीणी मल्लाव शोभा आरूडे माया डुरे मनिषा गायकवाड,छाया जाधव हालिमा शेख,देढे ताई,कविता पटेकर, पोर्णिमा भगत उपस्थित होत्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...