रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करा :महापालिका पदाधिकाऱ्यांची मागणी

Date:

  • तीन पदाधिकाऱ्यांनी घेतली विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची भेट
  • पैसे अगोदर घ्या पण’ रेमडेसिव्हीर , ऑक्सिजन उपलब्ध करुन द्या’

पुणे –

शहरात सद्यस्थितीत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिका सर्वांच्या सहकार्याने विविध पातळीवर यासंदर्भात उपाययोजना राबवित आहे. मात्र शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता यांच्या तुलनेत रेमडेसीवीर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा हे आमच्या समोरील सर्वात मोठे आव्हान आहे, त्यामुळे रेमडेसिवीर आणि मुबलक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावेत’, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विभागीय आयुक्त सौरव राव आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे केली. तसेच रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी निधी पूर्ण आम्हीदेऊ फक्त दोन्हींचा साठा उपलब्ध करून द्यावा, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

महापौर मोहोळ यांच्यासोबत सभागृह नेते गणेश बीडकर आणि स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने हेही उपस्थित होते. रेमडीसिविर आणि ॲाक्सीजन या दोन्हींचे नियंत्रण राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आहे.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘शहरातील नागरिकांसाठी जास्तीत जास्त कोरोना टेस्टींग करण्याबरोबर रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्सची उपलब्धता आणि नागरिकांचे लसीकरण आम्ही युद्ध पातळीवर करत आहोत. महानगरपालिकेच्या स्तरावर आमचे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. याशिवाय खाजगी हॉस्पिटल्सचे सुध्दा ८०% बेड्स ताब्यात घेऊन रुग्णांवर उपचार चालू आहेत. परंतु सद्यस्थितीसंख्येच्या तुलनेल रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा पुरवठा अत्यल्प आहे. परिणामी रेमडेसीवीर इंजेक्शनच्या अभावी बहुसंख्य रुग्ण आपले प्राण गमावत आहेत, ही अत्यंत दुखद बाब आहे. शिवाय २५० मेट्रिक टन ॲाक्सीजन प्रतिदिन शहराला गरज आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे आवश्यक आहे.’

‘महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत रेमडेसीवार इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून दिल्यास, पुणे महानगरपालिकेतर्फे स्वखर्चाने ही सर्व इंजेक्शन्स विकत घेऊन शहरातील रुग्णांकरिता सदर इंजेक्शन्स उपलब्ध करुन देण्याचा आमचा मानस आहे. तरी यासाठी आम्ही विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन विनंती केली आहे,’ असेही महापौर मोहोळ म्हणाले.

पुण्यातील रुग्णालयांच्या ऑक्सिजन यंत्रणेच्या ऑडीटचे महापौरांचे आदेश !

नाशिकच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ती पुण्यातील सर्व रुग्णालयांच्या ऑक्सिजन यंत्रणेचे फायर ऑडिटच्या धर्तीवर ऑडिट करावे, असे आदेश महापौर मोहोळ यांनी प्रशासनाला दिले आहेत. शिवाय या संदर्भातील अहवाल सादर करावा, अशा सूचनाही मोहोळ यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...