एका अग्रगण्य निर्मात्या कंपनीला ही मालमत्ता ९ वर्षांच्या लॉक-इन कालावधीसाठी लीजवर देण्याचा निर्णय
· एकूण प्रवेश उत्पन्न १० टक्के आणि लक्ष्यित आयआरआर १३.१० टक्के अशी कंपनीची ऑफर
· हिंजवडी हा आयटी क्षेत्रातील नोकऱ्या परविणारा, तसेच मोठ्या टाउनशिप प्रकल्पांचा समावेश असलेला एक विकासान्मुख निवासी परिसर.
· देशभरात ७०० कोटींहून अधिक ‘एयूएम’ना वित्तपुरवठा केल्यानंतर आता ही ‘स्ट्रॅटा’ची राष्ट्रीय स्तरावरील सोळावी मालमत्ता.
· ‘स्ट्रॅटा’च्या प्लॅटफॉर्मवर सध्या ३० हजार वापरकर्ते आणि १९०० सक्रिय गुंतवणूकदार यांचा सहभाग
पुणे 20 जुलै २०२२ : भारतातील आघाडीची टेक-सक्षम कमर्शियल रिअल इस्टेट (सीआरई) गुंतवणूक प्लॅटफॉर्म असलेल्या ‘स्ट्रॅटा’ने हिंजवडी येथे एक भव्य, अ श्रेणीची व्यावसायिक मालमत्ता सादर करून पुण्याच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. एका अग्रगण्य निर्मात्या कंपनीला लीजवर दिलेली ही मालमत्ता अंदाजे ३५ कोटी रुपयांची आहे आणि तीमधून सरासरी १० टक्के भाड्याचे उत्पन्न मिळण्याची ‘स्ट्रॅटा’ला अपेक्षा आहे.
सुमारे ५० हजार चौ.फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेली ही नवीन कार्यालयाची मालमत्ता ९ वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह ६ वर्षांच्या कालावधीसाठी प्री-लीजवर देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, या मालमत्तेतून १३.१० टक्क्यांचा निव्वळ गुंतवणूकदार वार्षिक अंतर्गत परताव्याचा दर (आयआरआर) व्युत्पन्न होणे अपेक्षित आहे. त्यामुळे दीर्घकालीन पॅसिव्ह उत्पन्न निर्माण करणारी, चलनवाढीपेक्षाही जास्त परतावा देणारी, फायदेशीर व स्थिर मालमत्ता स्ट्रॅटाच्या दृष्टीने निर्माण झाली आहे.
भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी या भागाची नोकरी पुरविणारे एक प्रमुख केंद्र म्हणूनही ओळख आहे आणि त्यामुळेच भारतातील प्रीमियम बहुराष्ट्रीय कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीने ही मालमत्ता भाडेतत्वावर घेतली आहे. टेक पार्क व अपमार्केट अपार्टमेंट कॉम्प्लेक्स, शॉपिंग व मनोरंजन केंद्र अशा विविध वास्तू एकवटलेला हिंजवडी हा परिसर मोठ्या टाउनशिप प्रकल्पांचा व लोकप्रिय निवासी परिसर म्हणूनही उदयास येत आहे. ‘स्ट्रॅटा’ची येथील ५० हजार चौ. फुटांची कार्यालयीन मालमत्ता ही इन्फोसिस, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, कॉग्निझंट यांसारख्या अत्याधुनिक आयटी कंपन्यांच्या कॅम्पसने वेढलेली आहे, ज्यामुळे ती ऑफिस स्पेससाठी आदर्श बनलेली आहे.
या मालमत्तेबद्दल माहिती देताना ‘स्ट्रॅटा प्रॉपर्टी मॅनेजमेंट’चे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन लोढा म्हणाले, “देशभरातील १५ प्रीमियम मालमत्तांना निधी उपलब्ध करून दिल्यानंतर, आम्ही आता महाराष्ट्रासारख्या भव्य राज्यात, पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीच्या शहरात आमची सोळावी मालमत्ता सादर करून आमचे अस्तित्व बळकट करीत आहोत. प्रीमियम स्वरुपाची भाडेतत्वावर उपलब्ध असलेली मालमत्ता, हिंजवडीसारखे प्रमुख स्थान आणि अ दर्जाच्या व्यावसायिक जागा व्यवस्थापित करण्याचे ‘स्ट्रॅटा’चे कौशल्य, या सर्व बाबी एकत्र आल्याने, आमची ही नवीन ऑफर अत्यंत किफायतशीर अशी गुंतवणुकीची संधी आहे, असे ठामपणे म्हणता येते. या संधीमुळे गुंतवणुकदारांना पुण्याच्या अदभूत प्रगतीच्या प्रवासात सहभागी होता येईल.”
“पुण्यातील मालमत्ता बाजारपेठेत गेल्या एका वर्षात जोरदार उलाढाली होऊ लागल्या असून निवासी व व्यावसायिक अशा दोन्ही विभागांमधील विक्रीने कोविडपूर्व पातळी ओलांडली आहे. विशेषत: आयटी, बीएफएसआय आणि निर्मिती या क्षेत्रांकडून प्रचंड मागणी असल्याने, पुण्यातील व्यावसायिक मालमत्ता बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात व्यवहार होत आहेत. या पार्श्वभूमीवर आमची मालमत्ता अत्यंत मोक्याच्या वेळी सादर होत आहे,” असे लोढा पुढे म्हणाले.
शहरात कोविडपश्चात पुनरुज्जीवनाची प्रक्रिया जोरात सुरू झाली असून नेमक्या याच काळात ‘स्ट्रॅटा’ने पुण्यात प्रवेश केला, याचे मोठे औचित्य आहे. देशभरातील १५ मालमत्तांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आता या कंपनीकडे बंगळुरू, होसूर, हैदराबाद, मुंबई, चेन्नई, जयपूर इत्यादी शहरांमध्ये एकूण २.८ दशलक्ष चौरस फूट इतकी, ७०० कोटींहून अधिक मूल्याची मालमत्ता व्यवस्थापनांतर्गत आहे.
व्यावसायिक रिअल इस्टेटचा अॅसेट क्लास म्हणून देशात प्रसार करण्यासाठी स्ट्रॅटा अथक प्रयत्न करीत आहे. कंपनीकडे ३० हजारांहून अधिक गुंतवणूकदार असून त्यात १९००हून अधिक गुंतवणूकदार सक्रिय आहेत. एचएनआय, कौटुंबिक कार्यालये, फॉर्च्युन ५०० कंपन्यांमधील वरिष्ठ व्यवस्थापन यांच्याखेरीज किरकोळ व संस्थात्मक गुंतवणूकदार अशा एक हजाराहून अधिक गुंतवणूकदारांचा सहभाग कंपनीच्या मागील सूचीमध्ये दिसून आला आहे.
किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सीआरई मालमत्तांमध्ये गुंतवणुकीची सुविधा, विविध प्रकारच्या मालमत्ता आणि वापरण्यास-सोपा असा ऑनलाइन प्लॅटफॉर्म या गोष्टी उपलब्ध करून देऊन देशातील सर्वात मोठा पर्यायी गुंतवणूक प्लॅटफॉर्म बनण्याची ‘स्ट्रॅटा’ची आकांक्षा आहे. आपल्या टेक-सक्षम प्लॅटफॉर्मद्वारे स्ट्रॅटा ही कंपनी जगभरातील किरकोळ गुंतवणूकदारांना त्यांच्या आवडीच्या विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट व्यावसायिक मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याचे सामर्थ्य आणि त्याचबरोबर चांगले उत्पन्न कमावण्याची संधी देते. कोटक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स, गृहास प्रॉपटेक, सेबर इन्व्हेस्टमेंट्स एलिव्हेशन कॅपिटल, मेफिल्ड आणि प्रॉपस्टॅक यांसारख्या संस्थात्मक गुंतवणूकदारांचे ‘स्ट्रॅटा’ला पाठबळ आहे.

