सक्तीची वीज बिल वसुली ताबडतोब थांबवा-आमदार शिरोळे

Date:

पुणे – कोविडची साथ, टाळेबंदी अशा कारणांनी अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. अशावेळी वीज बिलं कशी भरावीत अशी समस्या नागरिकांसमोर असताना महावितरण मात्र, सक्तीने वीज बिलांची वसुली करीत आहे. ती वसुली ताबडतोब थांबवावी अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महावितरणच्या समस्या सोडविण्यासाठी महावितरणचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांची भेट घेऊन आमदार शिरोळे यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि मागण्यांचे पत्रही दिले. यावेळी भाजपचे शहर सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे, तसेच मतदारसंघाचे भाजपाचे अध्यक्ष रवींद्र साळेगांवकर, गणेश बगाडे, अपूर्व खाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

वीज बिलाची सक्तीची वसुली करण्याऐवजी ग्राहकांना हप्ते बांधून द्यावेत. हॉटेल आणि जिम उद्योगाला वीजेच्या बिलात ४०टक्के सूट आणि व्याज माफी देण्यात यावी, अशीही मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

पाटील इस्टेट झोपडपट्टीत वर्षभरापूर्वी आग लागली होती. त्या आगीत अनेकांचे वीज मीटर जळून खाक झाले आहेत. त्या जळीतग्रस्तांना लवकरात लवकर वीजेचे नवीन मीटर बसवून मिळावेत, असेही आमदार शिरोळे यांनी तालेवार यांना सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...