पुणे-लाल महालातील राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा यांच्या समूहशिल्पा मध्ये स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांचा पुतळा बसवला गेला पाहिजे. पुणे महानगरपालिकेला संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेली दहा-बारा वर्षं झाली मागणी करून सुद्धा जाणीवपूर्वक सूडबुद्धीने शहाजी महाराज यांचा पुतळा बसवला जात नाही. पूर्वी राष्ट्रवादीची सत्ता असताना आणि आत्ता भाजपची सत्ता असताना सुद्धा वारंवार मागणी करून सुद्धा लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त मतांसाठी वापर करून त्यांच्या विचारांचा मात्र जागर करत नाहीत. महापौर आणि खासदार यांच्या पुढच्या राजकारणामुळे लाल महालात स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांचा पुतळा बसवला गेला नाही. ही शिवप्रेमी म्हणून फार मोठी खंत आहे. महापालिका आयुक्त यांनी पुतळ्याच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन लालमहालात स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांचा पुतळा बसवावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.
ते म्हणाले,’ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 348 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लाल महाल येथे संभाजी ब्रिगेड पुणे शहराच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. पाच नद्यांचे पाणी आणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा करण्यात आला. माजी उपमहापौर दिपक मानकर, शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर, माजी जिल्हाधिकारी प्रभाकर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
कोथरूड मध्ये शिवसृष्टी होणार होती. मात्र स्थानिक भागातील घाणेरडे राजकारणामुळे कोथरूड येथील ऐतिहासिक शिवसृष्टी चांदणी चौक मध्ये हलवण्यात आली. हे घाणेरडे राजकारण पुण्यात करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेणारे शिवाजी महाराजांच्या विचारांशी मात्र गद्दारी करत आहे, हे सहन होणार नाही. शिवसृष्टी चे काम का थांबवले गेले ते तात्काळ सुरू करावे.अशीही मागणी यावेळी करण्यात आली .
सौ. अप्सरी कासीम शेख संभाजी ब्रिगेड महिला आघाडी विभाग अध्यक्ष येरवडा,संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष ज्योतिबा नरवडे, सचिव संदीप कारेकर, सिद्धार्थ कोंढाळकर, कुमार पवार, अविनाश घोडके, कीर्तिकुमार घोरपडे, राजेश आडसूळ, शंकर तात्या कुटे, सौ. अप्सरी कासीम शेख, जनता वसाहत चे अध्यक्ष मनपल्ली सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

