मुंबई-सर्वोच्च न्यायालय खिशात असल्यासारखी विधाने सध्या भाजपकडून सुरू आहेत. शिंदे – भाजप सरकार हे राज्यावर लादलेले, आणि बेकायदेशीर सरकार आहे. यासाठी भाजपकडून राजभवनाचा गैरवापर करण्यात आला, असे रोखठोक मत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेची न्यायालयात लढाई सुरू असून आमचा न्यायालयावर संपूर्ण विश्वास आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
प्रश्न शिंदे सरकारच्या अस्तित्वाचा नाही, मोठा प्रश्न लोकशाहीच्या अस्तित्वाचा आहे.मुक्त आणि निष्पक्ष न्यायव्यवस्थेसाठीही ही मोठी परीक्षा आहे.. असे सुचक टविट संजय राऊतांनी केले आहे.

