पुणे- वडगाव बुद्रुक येथील जमीन खरेदी- विक्री व्यवसायीक विठ्ठल नामदेव पांगारे यांच्या समर्थनार्थ तसेच पांगारे यांना मिळत असलेल्या धमकी व पैशांच्या मागणी करणारांवर कारवाई करावी या मागणी साठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक सेल महिला आघाडीच्या अध्यक्षा हलिमा शेख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन, पुणे येथे मोर्चा नेऊन निवेदन देण्यात आले.
संबधित प्रकरणी तक्रार विठ्ठल नामदेव पांगारे यांनी धायरी पोलीसांकडे तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी सदर निवेदन स्वीकार करून यावर योग्यती चौकशी करून कारवाई करू अशे आश्वासीत केले.अशी माहिती हलिमा शेख यांनी येथे दिली .

