राज्यसरकारचा अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न- विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर.

Date:


अधिवेशन रद्द न करता या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे

मुंबई, दि. २२ फेब्रुवारी – कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन दोन दिवसांत आटोपल्यानंतर लोकसभा अर्थसंकल्प अधिवेशन रद्द करण्याच चित्र समोर उभ करण्यात येत आहे. महत्वांच्या विषयांवर विरोधक सरकारचा पर्दाफाश करतील ही सरकारला भीती आहे. म्हणूनच अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व क्षेत्रांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. अवकाळी पावसाचा विषय, वाढीव वीज बिलाचा विषय, कोरोनाचे संकट, महिलांचे विनयभंग, बलात्कार, कायदा सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा, असे अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. या गंभीर प्रश्नांना न्याय देण्यासाठी अधिवेशन रद्द न करता या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे अशी मागणी दरेकर यांनी केली.
दरेकर म्हणाले की, महाराष्ट्रात जे प्रश्न आज उभे राहिले आहेत, त्यासंदर्भात समाजातील प्रत्येक घटकांमध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे तो आंदोलन, मोर्चाच्या माध्यमातून बाहेर येत आहे. सर्वसामान्य लोकांकडे आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. शिक्षकांच आंदोलन, मराठा समाजाच आंदोलन असेल किंवा अनेक आंदोलन होत आहेत. हे सर्व प्रश्न अधिवेशनाच्या तोंडावर उफाळून येतील, या भीतीने राज्यसरकार अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, असा सवाल दरेकर यांनी केला. वर्षभर कोरोनाच्या नावाखाली सरकारने काहीच केलं नाही, आता त्याच कारणास्तव अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, सर्व सुरक्षात्मक काळजी घेऊन अधिवेशन झालं पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, असाच आमचा सरकारकडे आग्रह राहील.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली:डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा, पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल

पुणे:राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून:विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार; अजित पवारांच्या अपघाताबाबत संशय

सत्ताधारी पक्ष मस्तीमध्ये असल्याची टीका,घरगुती डिजिटल मीटरचा विरोध,सोलार...

आत्मचरित्र लिहिण्यास बंदी हि तर विचार स्वातंत्र्याची गळचेपी, स्वातंत्र्यावर गदा: अनंत गाडगीळ

मुंबई:माजी लष्कर प्रमुखांच्या पुस्तकातील एका संदर्भाचा संसदेत उल्लेख झाल्यांनतर...

रेड जायंट मूव्हीजच्या ‘KHxRK’मुळे 47 वर्षांनंतर कमल हासन आणि रजनीकांत एकत्र

रेड जायंट मूव्हीजच्या आगामी चित्रपट ‘KHxRK’ मुळे भारतीय चित्रपटसृष्टी...