सन २०१९ आणि २०२० चे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

Date:

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी आणि संगीताचार्य कै.अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मराठी चित्रपटासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार मधु कांबीकर यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार वसंत इंगळे यांना जाहीर

मुंबई, दि. 22 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन 2019 आणि 2020 या वर्षासाठीचे राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील मराठी नाटक कलाक्षेत्रासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार कुमार सोहोनी यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार गंगाराम गवाणकर यांना जाहीर करण्यात आला आहे. कंठसंगीतासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार पंडितकुमार सुरुशे यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार कल्याणजी गायकवाड यांना जाहीर करण्यात आला आहे. उपशास्त्रीय संगीतासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार शौनक अभिषेकी यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार देवकी पंडित यांना जाहीर करण्यात आला आहे. मराठी चित्रपटासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार मधु कांबीकर यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार वसंत इंगळे यांना जाहीर करण्यात आला आहे. किर्तनासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार ज्ञानेश्वर वाबळे यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार गुरुबाबा औसेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. शाहिरीसाठी सन 2019 साठीचा पुरस्कार अवधूत विभूते यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  कै. कृष्णकांत जाधव (मरणोत्तर) यांना जाहीर करण्यात आला आहे. नृत्यासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार शुभदा वराडकर यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  जयश्री राजगोपालन यांना जाहीर करण्यात आला आहे. कलादानासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार अन्वर कुरेशी यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  देवेंद्र दोडके यांना जाहीर करण्यात आला आहे. वाद्यसंगीतासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार सुभाष खरोटे यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  ओंकार गुलवडी यांना जाहीर करण्यात आला आहे.तमाशासाठी सन 2019 साठीचा पुरस्कार शिवाजी थोरात यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  सुरेश काळे यांना जाहीर करण्यात आला आहे. लोककलेसाठी सन 2019 साठीचा पुरस्कार सरला नांदुलेकर यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  कमलाबाई शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. आदिवासी गिरीजनसाठी सन 2019 साठीचा पुरस्कार मोहन मेश्राम यांना तर सन 2020 साठीचा पुरस्कार  गणपत मसगे यांना जाहीर करण्यात आला आहे.

 सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 2020-21 व 2021-22 या वर्षांसाठीचे नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आणि संगीताचार्य कै.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.सन 2020 – 21 साठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार सतीश आळेकर यांना तर 2021 – 22 साठीचा पुरस्कार दत्ता भगत यांना जाहीर करण्यात आला आहे.सन 2020 – 21 साठीचा संगीताचार्य कै.बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार दिप्ती भोगले यांना तर 2021 – 22 साठीचा पुरस्कार सुधीर ठाकूर यांना जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सर्व्हायकल कॅन्सर :वेळेवर लसीकरण आणि तपासणी केल्याने टाळता येऊ शकतो.

सर्व्हायकल कॅन्सर जनजागृती महिना : ‘टाटा एआयए हेल्थ बडी’मुळे कुटुंबांसाठी प्रतिबंधात्मक सोपा व सहज उपाय उपलब्ध मुंबई, २८ जानेवारी २०२६ : गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) अनेकदा शांतपणे वाढतो, लक्षात न येता राहतो आणि गंभीर परिणाम घडवतो. पण ही परिस्थिती बदलू शकली, तर? या आजाराचा प्रतिबंध आजच आपल्या आवाक्यात असेल, तर? सर्व्हायकल कॅन्सर : टाळता येणारे संकट सर्व्हायकल कॅन्सर हा भारतातील महिलांमध्ये आढळणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. महिलांमधील एकूण कर्करोगांपैकी सुमारे २० टक्के रुग्ण या आजाराचे असतात. मात्र आनंदाची बाब म्हणजे, यापैकी सुमारे ९० टक्के रुग्णांना हा आजार वेळेवर लसीकरण आणि तपासणी केल्याने टाळता येऊ शकतो. तरीसुद्धा, ३० ते ४९ वयोगटातील केवळ २ टक्क्यांपेक्षाही कमी महिलांनी आजपर्यंत या आजाराची तपासणी करून घेतलेली आहे (स्रोत: hpvcentre.net, cdc.gov, who.int). हे त्यांच्या उदासीनतेमुळे होत नाही, तर अनेक महिलांना योग्य माहिती, सुविधा आणि वेळेवर मदत मिळत नाही म्हणून असे होते. यावरचा उपाय सोपा आहे. प्रतिबंधासाठी आधीच एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस व्हॅक्सिन) ही लस घेणे, हा ‘सर्व्हायकल कॅन्सर’पासून संरक्षण मिळविण्याचा प्रभावी मार्ग आहे. प्रतिबंधाची सुरुवात वेळेवर कृतीपासून होते गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याआधीच एखाद्या कुटुंबाने पावले उचलली तर काय? टाटा एआयए हेल्थ बडी कुटुंबांना त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण घेण्यास सक्षम करते. ‘हेल्थ बडी’च्या सुविधांमधून ‘एचपीव्ही’चे लसीकरण सहज उपलब्ध होत असल्याने, ग्राहकांना ‘सर्व्हायकल कॅन्सर’पासून संरक्षण मिळवता येते, तेही सवलतीच्या दरात. बाहेर वेगवेगळ्या अपॉइंटमेंट्स घेण्याचा त्रास आणि गुंतागुंतीच्या प्रक्रिया असतात. त्यांपासून टाटा एआयए सुटका करून देते. त्यामुळे योग्य वेळी, योग्य पाऊल उचलणे कुटुंबांसाठी सोपे होते. ‘टाटा एआयए हेल्थ बडी’चा वापर ग्राहक कंपनीच्या अ‍ॅपवर करू शकतात: अॅंड्रॉईड : गूगल प्लेवर – टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स अॅपआयओएस : अॅप स्टोअरवरवर – टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स अॅप ‘टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स’चे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि बिझनेस मिड ऑफिसमधील मार्केटिंग विभागाचे चीफ ऑफ प्रॉडक्ट्स सुजीत कोठारे म्हणाले, “सर्व्हायकल कॅन्सर हा भारतातील महिलांना भेडसावणारा खूप मोठा धोका आहे, पण त्याचा प्रतिबंध आपल्या हातात आहे. एचपीव्ही लसीकरणासारखे सक्रिय पाऊल वेळेवर उचलल्यास आपण आगामी पिढ्यांचे संरक्षण करू शकतो. महिलांना निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक साधने देण्यासाठी आम्ही ‘टाटा एआयए’मध्ये कटिबद्ध आहोत. आमच्या टाटा एआयए हेल्थ बडी सुविधांद्वारे आम्ही एचपीव्ही लसीकरणावर खास सवलत देत आहोत. त्यातून आम्ही ज्या समुदायांची सेवा करतो त्यांच्या आरोग्यकल्याणाप्रती असलेली आमची बांधिलकी अधिक बळकट करतो. एकत्र येऊन आपण ‘सर्व्हायकल कॅन्सर’विरुद्धच्या लढ्यात दीर्घकालीन आणि सकारात्मक बदल घडवू शकतो.” फक्त लसीकरणापुरतीचच नव्हेस तर प्रत्येक टप्प्यावर सर्वांगीण साथ सर्व्हायकल कॅन्सरचा प्रतिबंध ही केवळ सुरुवात आहे. टाटा एआयए हेल्थ बडी हे अॅप कुटुंबाच्या संपूर्ण आरोग्यप्रवासात साथ देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यात पुढील सुविधा मिळतात: ·         डॉक्टरांशी सल्लामसलत : गरज पडेल...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भव्य रंगावलीतून अभिवादन

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे आयोजन पुणे : महाराष्ट्राचे...

वास्तुकला आणि डिझाइन क्षेत्रातील उत्कृष्टतेचा होणार गौरव

गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुपतर्फे जीवीस अवॉर्ड्स २०२६सीझन ५ चे आयोजन अर्ज नोंदणीसाठी ३१ जानेवारी २०२६ अंतिम तारीख असेल पुणे , २९ जानेवारी २०२६ – गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुपच्या लॉक्स एण्ड आर्किटेक्चरल सोल्युशन्स विभागाने भारतातील वास्तुकला आणि अंतर्गत सजावट क्षेत्रातील उत्कृष्टतेचा गौरव करण्यासाठी जीवीस अवॉर्ड्स २०२६ची घोषणा केली आहे. यंदाचे या पुरस्काराचे ५वे पर्व आहे. या वार्षिक पुरस्कारांद्वारे देशभरातील नाविन्यपूर्ण प्रकल्प, अफाट कल्पकता आणि पर्यावरणपूरक शाश्वत डिझाइन पद्धतींचा सन्मान केला जाणार आहे. देशभरातील सर्व वास्तुविशारद आणि डिझाइर्नसाठी ही स्पर्धा खुली असून, नामांकित तज्ज्ञांच्या समितीद्वारे या प्रवेशिकांचे मूल्यमापन केले जाईल. मार्च २०२६मध्ये एका भव्य सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. गोदरेज व्हॅल्यू को-क्रिएटर्स क्लबचा एक भाग असलेला हा उपक्रम, उद्योगातील व्यावसायिकांना एकत्र आणून डिझाइनवर आधारित विचारसरणीला चालना देण्यासाठी आयोजित केला जातो. खालील तारखांनुसार कार्यक्रमाचे नियोजन पार पाडले जाईल: ·         पुरस्कारासाठी प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत: ३१ जानेवारी २०२६ ·         प्राथमिक फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांची घोषणा: ७ फेब्रुवारी २०२६ ·         निवड समितीच्या पाहणीत थेट प्रक्षेपणातून होणारी अंतिम फेरी : १३ आणि १४ फेब्रुवारी २०२६ ·         विजेत्यांची घोषणा आणि पुरस्कार सोहळा: ७ मार्च २०२६ यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात निवासी, व्यावसायिक, संस्थात्मक आणि आदरातिथ्य अशा विविध क्षेत्रांतील एकूण १५ श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे डिझाइन क्षेत्रातील व्यावसायिकांना त्यांचे सर्वोत्तम काम प्रदर्शित करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या स्पर्धेसाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत पूर्ण झालेले प्रकल्प ग्राह्य धरले जातील. जीवीस अवॉर्ड्स २०२५ बद्दल उत्साह व्यक्त करताना, गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुपच्या लॉक्स एण्ड आर्किटेक्चरल सोल्युशन्सचे बिझनेस प्रमुख श्री. श्याम मोटवानी म्हणाले, ‘’जीवीस हे नेहमीच डिझाइनमधील उत्कृष्टता तसेच घर आणि कार्यालयीन स्थळांचे डिझाइन घडवणा-या व्यक्तींचा सन्मान करणारे व्यासपीठ ठरले आहे. यंदाच्या ५व्या पर्वात आर्किटेक्ट्स आणि डिझायनर्सकडून नाविन्यपूर्ण, जबाबदार आणि माणूस-केंद्रित डिझाइन उपायांद्वारे सातत्याने नवे मापदंड सादर करण्याचे कौशल्य पाहणे उत्सुकतेचे ठरेल. आतापर्यंत २ हजारांहून अधिक नामांकने प्राप्त झाली आहेत. यंदाच्या पर्वात सखोल आणि विचारपूर्वक नियोजन दाखवणारे तसेच डिझाइन उत्कृष्टतेचे निकष नव्याने ठरवणारे प्रकल्प अनुभवण्याची आम्हांला उत्सुकता आहे.’’   देशातील प्रसिद्ध आर्किटेक्ट्स, डिझाइन क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ या पुरस्कार सोहळ्यासाठी परीक्षक म्हणून कामकाज पाहतील. यंदाच्या पर्वातील विजेत्यांच्या निवडीसाठी आर्किटेक्ट कोलकाता येथील विवेक सिंग राठोड (सॅलियंट), अहमदाबादचे आर्किटेक्ट हार्टमुट (ब्लॉटर), मुंबईचे आर्किटेक्ट यतिन पटेल (डीएसपी डिझाइन असोसिएट्स), दिल्लीचे आर्किटेक्ट सौरश चंद्रा (डीडीएफ कन्सल्टंट्स), पुण्यातील आर्किटेक्ट राहुल साठे(सीसीबीए), दिल्लीचे आर्किटेक्ट चरणजीत सिंह शाह (क्रिएटीव्ह ग्रुप) यांसारख्या दिग्गज व्यक्ती परिक्षक म्हणून निमंत्रित केले आहेत. विविध प्रकारच्या वास्तुकलेत या तज्ज्ञांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या अनुभवांसह सामूहिक संवाद आणि ज्ञानाच्या बळावर पुरस्कार विजेत्यांची निवड केली जाईल. पुरस्कार निवडीची प्रक्रिया अत्यंत काटोकोरपणे, पारदर्शक आणि विश्वासार्हतेने पार पाडली जाईल. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले भारतीय वास्तुविशारद, अंतर्गत सजावटकार यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सर्वांनी आपली कुशलता नामांकित परीक्षकांच्यासमोर सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जीवीस अवॉर्ड्स हे डिझाइन क्षेत्रातील उत्कृष्टतेचे आणि मानाचे प्रतीक म्हणून संबोधले जाते. या स्पर्धेतील विजेत्यांचा मार्च २०२६मध्ये एक भव्य सोहळ्यात सन्मान केला जाईल. यासह विजेत्यांना गोदरेजचे विविध प्लॅटफॉर्म्स आणि भागीदार माध्यम समूहांच्या माध्यमातून देशभरात प्रसिद्धी मिळवण्याची सुवर्णसंधी मिळेल. अधिक माहितीसाठी तसेच नोंदणीसाठी https://www.geeveesawards.com/sign-up या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. संपर्क क्रमांक - +918657028166