एसटी कर्मचारी संप बेकायदेशीर, कर्मचाऱ्यांविरोधात महामंडळ अवमान याचिका दाखल करणार- अनिल परब

Date:

मुंबई- एसटी कर्मचारी संप बेकायदेशीर आहे, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आम्ही आजही आवाहन करत आहोत. कोणाच्या तरी सांगण्यावरुन वातावरण खराब होऊ नये. संप मागे घ्या. मात्र, एसटीचा संप सुरु आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता व्यवस्था करतोय, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. त्याचवेळी या संपाबाबत अवमान याचिका दाखल करत आहे, असे ते म्हणाले.राज्यभरात आज एसटी कर्मचारी आपल्या मागण्या घेऊन आंदोलन करत आहेत. न्यायालयाने कामावर हजर होण्याचे निर्देश दिल्यानंतर देखील एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली आहे. जोपर्यंत एसटी महामंडळाचा राज्य शासनात समावेश होत नाही, तो पर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही या मागणीवर ते ठाम आहेत. एसटी महामंडळ देखील आता कामगारांविरोधात न्यायालयात जाणार आहेत.

इंडस्ट्रीयल कोर्ट आणि हायकोर्टाने कोर्टाच्या हे आंदोलन चुकीचे असल्याचे म्हणत आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करण्यास सांगितले होते.दरम्यान, उद्या हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी काल सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी देण्याचा दिली आहे.

आंध्रप्रमाणे शासकीय सेवेत सामावून घ्याअॅड. गुणरत्न सदावर्ते, एसटी कर्मचारी संघटनेचे वकील
आंध्र प्रदेशप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना राज्याच्या शासकीय सेवेत सामावून घ्यावे, आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना भरपाई द्यावी, जात आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करा, अशी संघटनांची मागणी आहे. –

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...