पुणे – महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलींनी परीक्षेत बाजी मारली असून, १२ वी प्रमाणे १० वीतही कोकण विभाग राज्यात पहिला आला आहे. राज्याचा एकूण निकाल ८८.७४ टक्के इतका लागला आहे.तर पुण्याचा निकाल ९१. ९५ टक्के तर कोकणाचा निकाल ९६. १८ टक्के एवढा लागला आहे .
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद दिलेल्या माहितीनुसार, यंदा दहावीच्या परीक्षेत एकूण १४,५८,८५५ विद्यार्थी पास झाले आहेत. यात ९१.४६ टक्के मुली तर ८६.५१ टक्के मुले पास झाली आहेत. राज्यात बाजी मारलेल्या कोकण विभागाचा निकाल ८८.७४ टक्के लागला. तर, नागपूर विभागाचा सर्वात कमी ८३.६७ टक्के निकाल लागला आहे.
अगोदरच विलंब झालेल्या या निकालाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून होते. दुपारी १ वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर झाला यंदाचा निकाल उशिरा लागला नसून, महापालिका निवडणुकांमुळे परीक्षा सात दिवस उशिरा सुरु झाली होती. तेवढ्याच दिवसांनी निकाल लांबला. गेल्या वर्षी १ मार्चपासून परीक्षा सुरु झाली होती अन् त्याचा निकाल ६ जून रोजी लागला होता.
यंदा कला आणि सांस्कृतिकचे अतिरिक्त गुण देण्यात आल्याने यवर्षी चांगला निकाल लागण्याची होती. राज्यातील स्थानिक पातळीवरील निवडणुकांमुळे दहावीचा निकाल पुढे ढकलण्यात आला होता. शिवाय, ज्या विद्यार्थ्यांनी कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे, अशा विद्यार्थ्यांना गुण देण्यास मंडळाकडूनही विलंब झाला.
कला, क्रीडा आणि सांस्कृतिकसाठी विशेषगुण देण्यात यावे, यासाठी सुमारे १० हजारापेक्षा अधिक विनंती अर्ज दाखल झाले होते, असे मुंबई विभागाने गेल्या आठवड्यात म्हटले होते.
विभागनिहाय निकाल –
कोकण- ९६.१८ टक्के
कोल्हापूर- ९३.५९ टक्के
पुणे- ९१.९५ टक्के
मुंबई- ९०.०९टक्के
औरंगाबाद- ८८.१५ टक्के
नाशिक- ८७.७६ टक्के
लातूर- ८५.२२ टक्के
अमरावती- ८४.९९ टक्के
नागपूर- ८३.६७ टक्के
– अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ८५.७२ टक्के
– शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या ३२
– गेल्या वर्षीपेक्षा निकाल ०.८२ टक्क्यांनी घटला
– १८ जुलैपासून फेरपरिक्षा

