समता, समानता, समाजिक एकता, बंधूता यांचे प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज – संतोष शिंदे
‘पुणे- छत्रपती शिवाजी महाराज हे ‘कुळवाडीभुषण बहुजन प्रतिपालक होते…’ ते शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे राजे होते. म्हणून शिवरायांना डोक्यावर घेताना त्यांचे सामाजिक एक्याचे विचार डोक्यात घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रयतेच्या सामाजिक ऐक्याला, महान विचारांना… प्रत्येकाने प्रेरणा म्हणून जगण्यासाठी त्यांचे क्रांतिकारी शौर्य, स्त्री सन्मानाला, दुर्ग संपन्न वैभवाला… शेतकऱ्यांना सन्मानाला, रयतेच्या विश्वासाला, धुरंदर राजकारणाला, महान मातृत्वाच्या सन्मानाला… कार्यकर्त्यांनी सर्वश्रेष्ठ मानलं पाहिजे.असे प्रतिपादन येथे संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केले . छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज ३३८वा स्मृती दिनाच्या औचित्याने शिवचरित्र’ वाचन करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
संभाजी ब्रिगेड’चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, हवेली तालुकाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष रघूवीर तुपे, अशोकराव सातपुते, हवेली तालुका कार्याध्यक्ष शिवाजी पवार, जोतिबा नरवडे, संजय चव्हाण, सुरेखा जुजगर, सपना माळी, सचीन जोशी, महेंद्र जाधव, मंदार बहिरट, विवेक तुपे, अजय पवार आदी उपस्थित होते.