दत्त मंदिर चौक,मांगल्य कार्यालय,पुणे :” कलयुगातील कर्ण पुरस्कार ” प्रदान समारंभ आज श्रीनाथ टॉकीज चौक येथील मांगल्य कार्यालय, येथे संपन्न झाला.कोरोना काळातील समाजसेवी काम करणाऱ्या मान्यवरांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. माजी उपमहापौर दीपक मानकर, बाळासाहेब दाभेकर, डॉ. गौतम छाजेड, महेंद्र पवार, राजेंद्र परदेशी, जावेद खान यांना ” कलयुगातील कर्ण पुरस्कार ” प्रमुख पाहुणे महापौर मुरलीधर मोहोळ व अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे याच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. दत्ता सागरे ,अभय छाजेड या प्रसंगी उपस्थित होते.या प्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे शॉल , श्रीफळ, व स्मृतिचिन्ह श्रीनाथ चौक मित्र मंडळ यांच्या वतीने देऊन सत्कार करण्यात आले.
आपले मनोगत व्यक्त करताना दीपक मानकर म्हणाले, दानवीर कर्णाच्या नावाने हा पुरस्कार मला आपण दिला आहे याचा आनंद आहे परंतु कर्ण होणे सोपे नाही, त्यासाठी खूप काही भोगावे लागते याची मला जाणीव आहे. त्याच प्रमाणे माझ्या आई ने कायम गोर गरिबांना मदत करण्याचे संस्कार माझ्यावर केले आहे, त्या नुसार काम करण्याचे बळ कायमच मिळत असते असे ते म्हणाले.
महापौर मुरलीधर मोहोळ आले मनोगत व्यक्त करताना, कोरोनाच्या सुरवातीपासून आज पर्यंत स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचे आभार व ऋण मानले. समाज कार्य हेच परमोधर्म मानून प्रत्येकाने या संकटाच्या काळात मदतीचा हात देऊन प्रत्येकाने आपल्या परीने जमेल ती मदत केली, दीपक मानकर यांनी कोरोना च्या काळात अडीच हजार लोकांना रोज दोनीही वेळेचे जेवण व अठरा हजार लोकांना तीन महिन्याचे राशन दिले, त्या बद्दल आपले खूप खूप आभार असे महापौर म्हणाले. या सर्वांचं मनापासून आभार. कार्यक्रमाची संकल्पना दत्ता सागरे, कुलदीप कदम यांची होती. कार्यक्रमाचे संयोजक कैलास परदेशी, आनंद सागरे, दर्शन कदम यांनी केले तर सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले व राजेंद्र पवार यांनीं सर्वांचे आभार मानले.

